Eknath Shinde : नुकताच शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला. शिंदे गट आणि भाजप मिळून १८ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. मात्र, खातेवाटपाची बैठक होण्याआधीच शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली आहे.
दोन दिवसांपूर्वीच तानाजी सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, ते आज पुण्याच्या दौऱ्यावर असताना अचानकपणे त्यांची प्रकृती बिघडली. तानाजी सावंत यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तातडीने पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
त्यामुळे आज होणाऱ्या खातेवाटपाच्या बैठकीला ते गैरहजर राहणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली कोणते खाते कोणाला दिले जाईल यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात प्रत्येक मंत्र्यांना प्रत्येकी दोन ते तीन खात्यांचे पर्याय विचारण्यात आले आहे. मंत्र्यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वाला ते पर्याय पाठवले आहेत.
कोणत्या मंत्र्याला कोणती खाते द्यायची हे मात्र अद्याप कळवण्यात आले नाही. सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह २० मंत्री आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे ९ व भाजपचे ९ मंत्र्यांनी मंगळवारी शपथ घेतली.
यावेळी शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड आणि गुलाबराव पाटील या मंत्र्यांनी शपथ घेतली. तर भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि मंगलप्रभात लोढा इत्यादी नेत्यांनी शपथ घेतली.
तसेच १५ ॲागस्टपूर्वी खाते वाटप झाल्यास पालकमंत्री नेमता येईल आणि ते प्रत्येक जिल्हयात ध्वजारोहणासाठी उपस्थित राहू शकतील. यासोबतच १७ ॲागस्टपासून राज्य विधीमंडळाच पावसाळी आधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे आधिवेशनापूर्वी खाते वाटप झाल्यास मंत्र्यांना आपल्या विभागाचा आढावा घेता येऊ शकतो. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला ३९ दिवस लागले तर खाते वाटपासाठी किती दिवस लागणार असा सवाल आता निर्माण होत आहे.
महत्वाच्या बातम्या
Mukesh Khanna : ‘करवा चौथ’ची खिल्ली उडवणाऱ्या रत्ना पाठक यांना मुकेश खन्नांनी झाप झाप झापलं, म्हणाले…
BJP : भाजपच्या माजी खासदाराचे कर्करोगामुळे निधन, दोन दिवसांपुर्वीच फडणवीसांनी घेतली होती भेट
Rakshabandhan : रक्षाबंधनच्या आधीच गमावले दोन सख्खे भाऊ, मामानेच केला भाच्यांचा घात, वाचून हादराल
Eknath Shinde : शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, मंत्रिपद न मिळाल्याने ‘हे’ पाच आमदार नाराज