Eknath Shinde : बाबो! शिंदे सरकारमधील सगळेच मंत्री करोडपती, एकतर आहे ४४१ कोटींचा मालक

Eknath Shinde : शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी भाजपशी हातमिळवणी केली व राज्यात आपले सरकारही स्थापन केले. या गोष्टीला एक महिना उलटून गेल्यानंतरही अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी शिंदे गट आणि भाजप मिळून एकूण १८ नेत्यांचा शपथविधी पार पडला.

या नव्या मंत्रिमंडळातील एक नाव सध्या विशेष चर्चेत आहे. या आमदाराकडे प्रचंड संपत्ती असल्याने तो चर्चेत आला आहे. या श्रीमंत आमदाराचे नाव आहे मंगलप्रभात लोढा.

मंगप्रभात लोढा यांची एकूण संपत्ती ४४१ कोटी एवढी आहे. एवढी संपत्ती असणारे मंगलप्रभात लोढा हे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत. लोढा हे बांधकाम व्यावसायिक असून ते पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. शिंदेंच्या सरकारमधील सगळेच मंत्री करोडपती आहेत.

मागील पाच वर्षांपासून मंगलप्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. जीआरओएचई हर्नुर इंडिया रिअल इस्टेट रीच लिस्ट २०२० नुसार त्यांची एकूण संपत्ती ४४१ कोटी एवढी आहे. कोरोनाकाळात २०२० मधील बांधकाम व्यवसायातील सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये लोढा ग्रुप अग्रस्थानी असल्याचे अहवालात म्हटले आहे.

लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक आहेत. तसेच ते भाजपचे मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदारदेखील आहेत. आज राजभवनमध्ये पार पडलेल्या मंत्रिमडळाच्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटाकडून ९ आणि भाजपकडून ९ अशा १८ नेत्यांनी शपथ घेतली आहे.

यामध्ये शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील या नेत्यांनी शपथ घेतली आहे. तर भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा इत्यादी नेत्यांनी शपथ घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या
Mahendra Singh Dhoni: धोनीच्या मृत गर्लफ्रेंडचा फोटो पहिल्यांदाच आला समोर, तिच्यासमोर ऐश्वर्या, कतरिना पडतील फिक्या
‘पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यायचा असेल तर राजीनामा द्या’; तृप्ती देसाई यांनी चित्रा वाघ यांना डिवचलं
Shehnaz Gill : सलमान खानने शहनाज गिलची चित्रपटातून केली हकालपट्टी? स्वत: शहनाजने केला खुलासा, म्हणाली..
Boycott: एकीकडं प्रमोशन तर दुसरीकडे आपल्याच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची केली मागणी