तेलंगणात एक धक्कादायक प्रकार घडला. ज्याची देशभरात चर्चा होत आहे. तेलंगणाचे भाजप नेते राज्य कार्यकारिणीचे सदस्य असलेले ज्ञानेंद्र प्रसाद यांचा मृतदेह राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वांना धक्काच बसला. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समोर येत आहे. (BJP leader hanged himself from fan; You will be shocked to read the case)
या भयंकर घटनेमुळे तेलंगणात शोक व्यक्त केला जात आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्ञानेंद्र प्रसाद यांची आत्महत्या होती की हत्या? याबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेन्द्र प्रसाद हे सरलिंगमपल्ली मतदारसंघातून पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम पाहत होते. सोमवारी सकाळी प्रसाद यांच्या खाजगी स्वीय सहायकाने त्यांना नाश्ता देण्यासाठी रूमचा दरवाजा वाजवला मात्र कोणतेही उत्तर आले नाही.
त्यानंतर त्याने खिडकीतून डोकावले असता ज्ञानेन्द्र प्रसाद यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर तातडीने याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस नक्की हा घातपात आहे की आत्महत्या? याबाबत कसून तपास करत आहेत.
हैदराबादच्या मियापूर पोलीस ठाण्यात ज्ञानेंद्र प्रसाद यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व गोष्टींची तपासणी करत, सर्व बाबी पडताळून पाहून या मृत्यूमागे नक्की काय कारण आहे? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
ज्ञानेन्द्र प्रसाद यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांकडून नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद देणं दुर्दैवी – चित्रा वाघ
”भाजपने उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली मशीन भाजपकडेच आहे”
TET परीक्षेत अपात्र असतानाही अब्दुल सत्तारांच्या मुलीला २०१७ पासून मिळतोय सरकारी पगार