mahadev jankar on supriya sule | देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. आता भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणूकीच्या तयारीला लागलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप २०२४ ची निवडणूक लढणार आहे. त्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे.
भाजप मिशन ४५ वर काम करत आहे. महाराष्ट्रातील ४५ जागा भाजपला जिंकायच्या आहेत. त्यासाठी ते कामाला लागलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वर्चस्व असलेले बारामती सुद्धा भाजपच्या निशाण्यावर आहे. भाजपला आता बारामतीमधून आपला खासदार निवडून आणायचा आहे.
बारामतीतून आतापर्यंत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे खासदार म्हणून निवडून आलेले आहे. त्यामुळे तिथे पवारांचा जास्त प्रभाव आहे. त्यामुळे आता भाजपने बारामतीवर लक्ष्य केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर आहे.
आता या सर्व मिशनवर महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. योग्य प्लॅनिंग केले तर राष्ट्रवादीचा प्रभाव अटळ आहे, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. उमेदवारांच्या दृष्टीने भाजपने एकाच व्यक्तीवर फोकस ठेवला पाहिजे, असा सल्लाही महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर एका बाजूला धरण आणि दुसऱ्याबाजूला पाण्यासाठी घशाला कोरड पडेल अशी अवस्था आहे. इंदापूर तालुक्यातील ३२ आणि बारामतीतील २६ गावांचा पाणीप्रश्न तसाच आहे. मुळशी, दौंड याठिकाणीही समस्या तशाच आहे, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
निर्मला सीतारामन या बारामतीत लक्ष देत असतील तर त्याचं अभिनंदन आहे. बारामतीच्या जनतेचे माझ्यावर उपकार आहे. मला पावणे पाच लाख लोकांनी मतदान केले होते. भाजप हा मोठा पक्ष आहे. त्यांना सल्ला देण्याइतका मोठा नाही. भाजपानं रासपाला हा मतदारसंघ द्यायला हवा होता. २०१९ मध्ये भाजपच्या उमेदवाराला माझ्याएवढे मतदान झालेले नव्हते हे पक्षाने लक्षात ठेवले पाहिजे, त्यामुळे आता जर रासपाला जागा दिली, तर ते लढवण्यास तयार आहे, असेही महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
तसेच शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पण बारामतीमध्ये तशी परिस्थिती नाही. बारामतीत ७५ टक्के भाग विकासापासून दूर आहे. खडकवासला, पुरंदरची अजूनही स्थिती वाईट आहे. इंदिरा गांधी सुद्धा पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे बारामतीत अशक्य असं काही नाही, असेही महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आयुष्यातली पहिली निवडणूक शरद पवार कसे जिंकले?; त्यांच्या प्रतिस्पर्ध्यानेच सांगितला हा खास किस्सा
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आजही भाजपमध्ये येऊ शकतात, पण…; रावसाहेब दानवेंनी ठेवली ‘ही’ अट
…त्यामुळे शिंदे गटाचे सगळे आमदार अपात्र होणार; बड्या नेत्याने सांगीतली कायद्याची मेख






