शिंदे गट आणि शिवसेनेतील पेचप्रसंगावर अजून न्यायालयाचा निकाल आलेला नाही. धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कोणाला मिळणार? शिंदे गटातील १६ आमदार अपात्र आहे का? नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे पुढे नक्की काय होणार? असे असंख्य प्रश्न लोकांच्या मनात आहेत. याबाबतच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. (Therefore, all MLAs of Shinde group will be disqualified)
‘शिंदे गटाने पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे ते आमदार अपात्र आहेत,’ असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते पुढे असंही म्हणाले की, ‘दोन तृतीयांश सदस्यांचा गट दुसऱ्या पक्षात विलीन झाला पाहिजे,’ अशी राज्यघटनेत तरतूद आहे.
‘परंतु शिंदे गटाने तसे केले नाही. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याचे त्यांनी उल्लंघन केले आहे. या कारणाने ते आमदार अपात्र ठरतात.’ पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत मोठी चर्चा रंगली आहे.
‘ शिंदे गटासमोर विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही,’ अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचे समजते. पृथ्वीराज चव्हाण यांनी वेळोवेळी या संदर्भात आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता, अशी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेली उद्धव ठाकरे संदर्भातील प्रतिक्रिया सध्या स्थितीत न्यायालयात खरी ठरल्याचे देखील निदर्शनास आले.
पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. तसेच विधिमंडळातील कामकाजाचा दांडगा अनुभव त्यांना असल्यामुळे त्यांनी दिलेली प्रतिक्रिया या सर्व पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते.
महत्वाच्या बातम्या-
Uday Samant: शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू; केसरकरांना प्रवक्ते पदावरून काढल्याच्या चर्चेवर सामंतांनी थोपटले दंड
Dipak Kesarkar: १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करा; केसरकरांच्या लोटांगणानंतरही राणे आक्रमक
Esha Gupta: लॉन्जरी शोमध्ये ईशा गुप्ताचा दिसला सेक्सी अवतार, व्हिडिओ पाहून नेटकरी सुद्धा झाले घामाघूम