पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी सध्या केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका करताना दिसत आहेत. अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्यावतीने त्यांनी गरिबांसाठी आंदोलनात सहभाग नोंदवला. (Narendra Modi has never sold tea?)
जंतरनंतर या ठिकाणी झालेल्या या आंदोलनात प्रल्हाद मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हणू नका, त्यांनी चहा विकला नाही, अशा प्रकारचे खळबळजनक वक्तव्य केले आहे.
प्रल्हाद मोदी म्हणाले की, ‘आमचे वडील चहा विकायचे. आमच्या वडिलांनी छोट्याशा टपरीवर चहा विकून आम्हा सहा भावंडांना सांभाळले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चहावाला म्हणू नका. चहावाल्याचा मुलगा म्हणा,’ असे प्रल्हाद मोदी यांनी म्हंटले आहे.
अशा प्रकारचे मोठे वक्तव्य प्रल्हाद मोदी यांनी उल्हासनगर या ठिकाणी झालेल्या आंदोलनावेळी भाषण करताना केले आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
प्रल्हाद मोदी हे नरेंद्र मोदी यांचे सख्खे भाऊ आहेत. ते स्वतःही एक रेशन दुकान चालवतात. मागील काळात माझा भाऊ पंतप्रधान असला म्हणून काय झालं, मी उपाशी मरू का? अशाप्रकारचे वक्तव्य त्यांनी केले होते, असे बोलले जाते.
अखिल भारतीय रास्त भाव धान्य दुकानदार फेडरेशनच्या वतीने ९ मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. त्या मागण्यांचे निवेदन पंतप्रधान मोदी यांना देण्यात येणार असल्याचे फेडरेशनचे सचिव विश्वंभर बसू यांनी त्यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
..म्हणून मी मंगळसुत्र गळ्यात न घालता हातात घालते; अमृता फडणवीसांनी सांगीतले अजब लाॅजीक
‘उद्या उठसूट कोणीही वेगळे होऊन म्हणेल आम्ही पक्ष आहोत, हे लोकशाहीसाठी घातक’; सरन्यायाधीशांची शिंदे गटाला चपराक
कोकणचा सुपुत्र होणार भारताचा नवे सरन्यायाधीश; सद्याचे सरन्यायाधीश रमणा यांनीच सुचवले नाव






