..म्हणून मी मंगळसुत्र गळ्यात न घालता हातात घालते; अमृता फडणवीसांनी सांगीतले अजब लाॅजीक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखल्या जातात. न पटणाऱ्या गोष्टींवर निषेध व्यक्त करणे आणि आपल्या भूमिका बेधडकपणे मांडणे, असा त्यांचा स्वभाव सर्वांनाच परिचित आहे. अमृता फडणवीस यांचे एक वक्तव्य सध्या फार चर्चेत आहे. (..so I wear the Mangalsutra in my hands instead of around my neck; Strange logic told by Amrita Fadnavis)

छोट्या पडद्यावरील सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हजेरीला लावली होती. त्यावेळी काही मजेदार प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यातच तुम्ही मंगळसूत्र का घालत नाही? या प्रश्नावर भन्नाट उत्तर देऊन अमृता फडणवीस यांनी प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.

तुम्ही मंगळसूत्र नाही घातलं तर सासू ओरडत नाही का ? असा प्रश्न त्यांना कार्यक्रमात विचारण्यात आला. तेव्हा त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘मंगळसूत्र हे सौभाग्याचे निशाण असतं. तो आपला नवरा असतो.’

‘म्हणून मला वाटलं की, नवऱ्याने आपला गळा पकडण्यापेक्षा हात पकडावा, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी हातात घातलेलं मंगळसूत्र सर्वांना दाखवलं.’ त्यांच्या या बिनधास्त वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

स्वतः स्त्री सक्षम असावी, स्वावलंबी असावी, असे विचार अमृता फडणवीस कायम बोलताना दिसतात. त्या स्वतःही नोकरी करतात. बँकर असलेल्या अमृता फडणवीस उत्तम गायिका सुद्धा आहेत. मनासारखं स्वच्छंद जगणाऱ्या आणि स्वतःची आवड जपणाऱ्या अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून आजवर चालत आलेल्या चौकटीला छेद देताना दिसतात.

सुबोध भावेच्या याच कार्यक्रमात मोठ्या सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई सुळे यांनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली होती. आता अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

महत्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीस घाईघाईने दिल्लीला रवाना? काहीतरी खळबळजनक घडण्याची चिन्हे
कोकणचा सुपुत्र होणार भारताचा नवे सरन्यायाधीश; सद्याचे सरन्यायाधीश रमणा यांनीच सुचवले नाव
टोलमाफी संदर्भात नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा; शहरातील टोल माफ होणार