Share

स्मृती इराणीच्या मुलीला मिळाली क्लीनचीट; ‘त्या’ रेस्तराँच्या प्रकरणात हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी झोईश ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत येत आहे. गोव्यात असणाऱ्या एका बेकायदा रेस्तराँमुळे तिचं नाव समोर आलं आहे. ती या रेस्तराँची मालकीण असल्याचं बोललं जात आहे. या रेस्तराँमध्ये गोमांस मिळत असल्याची बाब समोर आल्यानं तिच्यावर आणि स्मृती इराणीवर अनेकजण टीका करत आहेत.

पण, आता या प्रकरणाबाबत दिल्ली हायकोर्टानं महत्वाचा निर्णय दिला आहे. स्मृती इराणी यांच्या मुलीला या प्रकरणात क्लीनचीट दिली असल्याचं समजत आहे. हायकोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं की, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची कन्या झोईश इराणी या दोघीही गोव्यातील रेस्तराँच्या मालक नाहीत.

शिवाय, या दोघींनी या रेस्तराँच्या परवान्यासाठी कुठलाही अर्ज केलेला नाही. हे रेस्तराँ किंवा त्याच्या जागा या दोन्हींपैकी एकही गोष्ट स्मृती इराणी किंवा त्यांच्या मुलीच्या मालकीची नाही, असे आमच्या निदर्शनास आल्याचे हायकोर्टाने सांगितले आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांच्या मुलीनं वकिलांमार्फत यापूर्वीच आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. गोव्यातील ‘सिली सोल्स’ नावाच्या रेस्तराँचे आपण मालक नाहीत, ना मी चालवते. तसेच स्मृती यांनी देखील आरोप फेटाळून लावत स्पष्ट केलं होतं की, ही लढाई आपण न्यायालयात लढूयात.

या प्रकरणात काँग्रेसने आरोप केले होते. म्हटलं होतं की, उत्पादन शुल्क विभागाने इराणी यांच्या मुलीला कारणे दाखवा नोटीस दिली होती. नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्याची कथितरित्या बदली करण्यात येत आहे. ही माहिती आरटीआयमधून मिळाली आहे.

इराणींच्या मुलीने सिली बनावट दस्तऐवज देऊन बार लायसन्स मिळविले. हे आरोप काँग्रेसचे मीडिया व प्रचारप्रमुख पवन खेडा यांनी केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणींना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावं, अशी मागणीही पवन खेडा यांनी केली होती.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now