कारगिल युद्धाला २३ वर्ष पूर्ण झाली. २६ जुलै हा कारगिल विजय दिवस भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे. पाकिस्तानी घुसखोरांशी युद्ध करत भारतीय सैन्याने विजय मिळवला. या युद्धात अनेक भारतीय जवान शहीद झाले. कारगिल विजयानंतर भारतीय सैनिकांना अनेकांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. (Modi went directly to the battlefield during the Kargil war despite not holding any post)
अशीच एक अनोखी गोष्ट आता समोर येत आहे. कारगिल युद्धावेळी भारतीय सैनिकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींमध्ये भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील समावेश होता.
गोष्ट त्या वेळची आहे, जेव्हा आपल्या पक्षाच्या कामासाठी नरेंद्र मोदी जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये होते. कारगिल युद्धाचे पडघम वाजले. त्यादरम्यान भारतीय जवानांना त्यांनी भेट दिली होती.
विशेष म्हणजे कोणत्याही उच्च पदावर नसतानाही देशाच्या सैनिकांविषयी मोदींच्या मनातील आदरभाव आणि प्रेम या भेटीतून व्यक्त झाल्याचे दिसते. कारगिलला भेट देण्याचा आणि सैनिकांशी संवाद साधण्याचा अनुभव मी कधीही विसरू शकत नाही, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी तेव्हाची आठवण सांगितली.
तेव्हाचा नरेंद्र मोदी यांचा एक दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात शहिदांचे स्मारक बांधले. हे स्मारक बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
पाकिस्तानी घुसखोरांनी भारताच्या अतिदुर्ग उंच भागातील कारगिल आणि द्रास या ठाण्यांवर कब्जा केला होता. घुसखोरांना त्या ठिकाणाहून हाकलवून लावण्यासाठी हे युद्ध लढले गेले. २६ जुलै रोजी भारताने या युद्धात विजय मिळवला. म्हणून २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून सबंध भारतात साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या-
सेनेतून बाहेर पडल्यानंतर मला संपवण्यासाठी गँगश्टर्सना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या; नारायण राणेंनी केला गौप्यस्फोट
शिंदेंमुळे ठाकरे घराण्यात उभी फूट; आणखी एक ठाकरे शिंदेंच्या गोटात, सख्खी भावजय शिंदेंच्या भेटीला
‘दिपक केसरकर हा भामटा आणि लबाड माणूस, नारायण राणेंना घाबरून तो शिवसेनेत आला’