Shivsena: ठाकरेंना धक्का! शिवसेनेचा धनुष्यबाण शिंदे गटाकडे जाणार? माजी निवडणूक आयुक्त म्हणाले…

Shivsena | एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी बंडखोरी केल्यापासून ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होईपर्यंत सगळ्या घडामोडी लोकांनी पाहिल्या पण अजूनही एका प्रश्नाचे उत्तर लोकांना मिळालेले नाही. नेमका शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाकडे जाणार? एकनाथ शिंदेंकडे की शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंकडे.

अनेकांना हा प्रश्न पडला आहे ज्याबद्दल बोलताना माजी निवडणुक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी याबाबत माहिती दिली. शिंदे गटाने असा दावा केला आहे की खरा शिवसेना पक्ष आमचा आहे. शिंदे गटाने केंद्रिय निवडणूक आयोगाकडे तसा दावा केला आहे.

त्यानंतर एस. वाय कुरेशी यांनी याबाबत माहिती दिली की, नेमका धनुष्यबाण कोणाकडे जाणार? मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. माहिती देताना त्यांनी काँग्रेसमध्ये झालेले १९६९ च्या बंडाचे उदाहरण दिले. कुरेशी म्हणाले की, आयोगासाठी हा नवा मुद्दा नाही.

१९६८ साली आयोगाने सिम्बॉल ऑर्डर तयार केल्यानंतर लगेचच काँग्रेसमध्ये वाद झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. त्यावेळी आयोगाने बहुमताच्या आधारे आमदार व खासदारांची संख्या विचारात घेऊन निर्णय घेतला होता. त्यानंतर बहुतेकवेळा आयोगाने त्याआधारेच निर्णय घेतला होता.

त्यानंतर असा तर्क लावला जात आहे की, कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाचे पारडे जड दिसत आहे.  कारण त्यांच्याकडे आमदार आणि खासदारांची संख्या जास्त आहे. पण कुरेशी असेही म्हणाले की, संघटनात्मक पातळीवरील बहुमतही विचारात घेतले जाते.

सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देताना सांगितले होते की, हा संपत्तीचा मुद्दा नाही. हा एक पक्ष असून तो दोन भागांमध्ये वाटता येणार नाही. पुर्ण पक्ष एकाकडे राहू शकतो आणि त्याचा निर्णय बहुमतावर होऊ शकतो.चार पाच वर्षांपुर्वी समाजवादी पक्षामध्ये मुलगा आणि वडिलांमध्ये वाद झाला होता.

मुलाने आपल्याकडे बहुमत असल्याचे सिद्ध केले होते. त्यानंतर आयोगाने अखिलेश यादव यांच्याकडे पक्ष राहिल असा निर्णय दिला होता. तशीच स्थिती शिवसेनेबाबत झाली आहे. पण संघटनात्मक पातळीवरील स्थितीकडे आयोग कशाप्रकारे पाहिल सांगता येत नाही.  त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे गटाकडून संघटनात्मक पातळीवर आपली ताकद लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जरी शिंदेंकडे आमदारांचा आणि खासदारांचा पाठिंबा असला तरी त्यांना संघटनात्मक पातळीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करावे लागेल.

महत्वाच्या बातम्या
“येत्या कार्तिकी एकादशीला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पांडुरंगाची पुजा करतील”
मला फसवून शिंदे गटात नेले, पुन्हा पक्षात घ्या; पुण्यातील बड्या शिवसेना नेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र
भाजप विरूद्ध शिंदे गटात जुंपली; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला शिंदे गटाकडून जोरदार प्रत्यूत्तर
Hot Summer: कडक उन्हामुळे ‘येथे’ ट्रेन चालवणेही झालंय कठीण, रेल्वेचे रुळही वितळले, वाचून हादराल