बंडखोर संतोष बांगरांचा खेळ खल्लास; विधानसभेला पराभूत करण्यासाठी तगडा नेता शिवसेनेत

शिवसेना पक्षातून मोठ्या प्रमाणात आमदारांनी, खासदारांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांना शह देण्यासाठी शिवसेना सुद्धा नवा डाव टाकत असल्याचे चित्र आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधकांना जवळ करण्याचा आणि पक्षप्रवेश देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होताना दिसतोय. याचा पहिला धक्का मराठवाड्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे आमदार संतोष बांगर यांना बसणार आहे.(Rebel Santosh Bangar’s Game over; Strong leader in Shiv Sena to defeat Vidhan Sabha)

संतोष बांगर यांचे प्रतिस्पर्धी आणि कळमनुरीत मोठं वजन असणाऱ्या व्यक्तीला पक्षप्रवेश देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी मतदारसंघात बांगरांना टक्कर देणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजित मगर हे लवकरच शिवसेना प्रवेशाच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते.

२०१९ ला विधानसभा निवडणुकीत नंबर दोन क्रमांकाची सर्वाधिक मतं अनिल मगर यांना मिळाली होती. त्याच अजित मगर यांनी सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींसंदर्भात आपल्या कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी एक बैठक घेतली.

बैठकीत कार्यकर्त्यांनी शिवसेना गटात सामील होण्याचा आग्रह मगर यांना केला आहे. यावर मगर यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. परंतु शिवसेनेकडून त्यांना बोलावणे आले असल्याची चर्चा आहे.

शिंदे गटात सामील झालेले बंडखोर आमदार संतोष बांगर यांना टक्कर देणाऱ्या अनिल मगर यांना जर येत्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. तर संतोष बांगर यांना मोठा धक्का बसू शकतो.

अजित मगर यांनी एका पक्षाकडून बोलावणे आले आहे. कार्यकर्त्यांशी त्यासंदर्भात बोलल्यावर त्यांनी पक्षात प्रवेश करण्याचा आग्रह केला आहे. परंतु आपण त्यावर लवकरच निर्णय जाहीर करू, असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या-|
कतरिना का दिपीका? कार्तिक आर्यनसोबत ऍक्शन चित्रपटात झळकणार ए-लिस्टर अभिनेत्री
चाहत्यांसाठी गुड न्युज! बाॅलीवूडमधील सर्वाधिक बोल्ड सिनेमाचा रिमेक लवकरच येणार; मल्लिकाचा खुलासा
वारं फिरलं! आदित्य ठाकरेंच्या रोड शोला तुफान गर्दी; बंडखोरांना धडकी तर शिवसैनिक झाले चार्ज