Share

”आदित्य ठाकरे वाघ आहे पण सध्या मटण खाण्याऐवजी वरण भात खातोय”

शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेनिमित्ताने नाशिक दौऱ्यावर आहेत. मनमाडमध्ये त्यांची सभा झाली. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि शिंदे गटात असणारे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यामध्ये चांगली जुंपलेली पाहायला मिळते (Aditya Thackeray is a tiger but now he is eating rice instead of mutton)

सुहास कांदे यांनी आपल्या बाजूने असलेल्या कार्यकर्त्यांसाठी घेतलेल्या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कांदे म्हणाले की, ‘आदित्य ठाकरे वाघ आहेत. पण सध्या मटण खाण्याऐवजी ते वरण-भात खात आहेत.’

सुहास कांदे यांच्या या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘गद्दारांना उत्तर देणार नाही. त्यांच्याशी मी बांधील नाही. मला प्रश्न विचारण्याची गद्दारांची लायकी नाही,’ अशा जळजळीत शब्दात आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता सुहास कांदेंना सडेतोड उत्तर दिल्याचे दिसते.

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे मनमाड येथे येणार असल्याचे सुहास कांदे त्यांना समजले. तेव्हा आदित्य ठाकरे यांना भेटून निवेदन देणार असल्याचे कांदेंनी म्हंटले होते. आता आमदार सुहास कांदे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यातील हे वाद- प्रतिवाद कुठपर्यंत जाणार? हे पहावे लागेल.

सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंच्या मनमाडमधील मेळाव्या आधीच मनमाडमध्ये सगळीकडे मतदारसंघातील विकास कामांची यादी आणि हिंदुत्वबाबतचे कडवट प्रश्न असणारे फ्लेक्स लावून आदित्य ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

हिंदुत्वापासून शिवसेना कशी दूर गेली, याबाबत सांगत त्यांनी अनेक प्रश्न विचारले आहे. माझं काय चुकलं? या आशयाचे फ्लेक्स मनमाडमध्ये सर्वत्र झळकत आहेत. यावर आता आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे यांच्यामधील वाद अधिकच ताणले जाणार असल्याचे दिसते.

महत्वाच्या बातम्या-
”आता राष्ट्रवादीसोबत युती नाही, याची सुरूवात जुन्नर विधानसभा मतदारसंघातून होणार”
फॅमिलीसाठी मोठी गाडी पाहिजे? ‘ही’ आहे महिंद्राची सर्वात स्वस्त एसयुुव्ही, वाचा किंमत अन् फिचर्स
Maruti Suzuki: मारूती सुझुकीची ‘ही’ एसयुव्ही देणार ह्युंदाई क्रेटाला टक्कर, देतेय तब्बल २७ किमीचे मायलेज

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now