Share

हृदय पिळवटून टाकणारी घटना; लटकलेल्या वायरचा बैलाला शाॅक अन् मालकासहीत सगळेच ठार

पावसाळ्यात विजेच्या खांबाचा, तारेचा करंट लागल्याने माणसं मरण पावलेल्या अनेक घटना कानावर पडत असतात. परंतु अशीच एक भयानक घटना वैजापूरच्या बायगाव या ठिकाणी घडली आहे. (The bull was shocked by the hanging wire and everyone including the owner was killed)

शेतामध्ये बोअरच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या विजेच्या तारांचा बैलगाडीला स्पर्श झाला. बैलगाडी लोखंडी असल्यामुळे विजेचा करंट त्या तारेमधून बैलगाडीत उतरला. त्याचा धक्का बैलगाडीवर असणाऱ्या एका व्यक्तीला लागला.

त्या माणसाला वाचवण्यासाठी गेलेला त्याचा भाऊ सुद्धा विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाला. दोन बैल, बैलगाडीचा मालक व त्याचा सख्खा भाऊ या भयंकर अपघातात जागीच मरण पावले आहेत. वैजापूरच्या बायगावातील चोळकर वस्तीवर ही दुर्दैवी घटना घडली.

चोळकर वस्तीवर राहणारे साहेबराव गणपत चोळकर हे पाऊस पडून गेल्याने शेतातली काम उरकून घराकडे जुना बायगाव- देवगाव रंगारी या गाडीवाटेने निघाले होते. तेव्हा वाटेतच दुसऱ्या शेतकऱ्याने विनापोल बोरवेलसाठी घेतलेली लाईटची केबल आणि सर्विस वायर बैलांच्या शिंगात अडकली त्यातून करंट पास झाला.

या विजेच्या धक्क्याने बैलाला आणि त्याच्या मालकाला शॉक बसला. या धक्क्यामध्ये बैलजोडीचा मृत्यू झाला आणि गाडी मालक साहेबराव चोळकर यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या लहान भावाचा सुद्धा जीव गेला. साहेबराव चोळकर (७०), बाबुराव चोळकर (५७) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन व्यक्तींची नावे आहेत.

या घटनेचा पंचनामा ग्रामीण रुग्णालयात पोलिसांकडून करण्यात आला. तसेच शिरूर पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.या धक्कादायक घटनेमुळे वैजापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या-
मी टू मुव्हमेंटमुळे चर्चेत आलेल्या या अभिनेत्रीचे पुन्हा गंभीर आरोप; म्हणाली, मी आत्महत्या करणार….
जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय भाजपला भोवला! तब्बल ७ ठिकाणी झाला दारूण पराभव
Aishwarya Rai: अनेक वर्षांनंतर ऐश्वर्याला आठवला सलमान, म्हणाली, सुरूवातीला आमिर आणि सलमान…

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now