मुले सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश आणि वकील ९ वाजल्यापासून त्यांचे काम का सुरू करू शकत नाहीत? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू यू ललित यांनी ही टिप्पणी केली आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने नियोजित वेळेपूर्वी सुनावणी सुरू केल्यानंतर त्यांनी ही टिप्पणी केली.(Supreme Court, Attorney General, U U Lalit, S Ravindra Bhat)
सुप्रीम कोर्टाचे खंडपीठ १०.३० वाजता भरते आणि त्यानंतर प्रकरणांची सुनावणी सुरू होते, जी दुपारी ४ वाजेपर्यंत चालते. दरम्यान, दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी असते. मात्र, या प्रथेच्या विरोधात न्यायमूर्ती ललित यांनी शुक्रवारी ९.३० वाजता सुनावणी सुरू केली. त्यांच्या खंडपीठात न्यायमूर्ती एस रवींद्र भट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचाही समावेश आहे.
देशाचे माजी अॅटर्नी जनरल आणि जामीन खटल्यात हजर झालेले प्रख्यात वकील मुकुल रोहतगी यांनी नियोजित वेळेपूर्वी खटला सुरू केल्याबद्दल खंडपीठाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, खटल्याची कार्यवाही सुरू करण्यासाठी ही वेळ अधिक योग्य आहे. यावर न्यायमूर्ती ललित यांनी उत्तर दिले की, न्यायालयाचे कामकाज लवकर सुरू व्हावे, असे माझे नेहमीच मत आहे.
न्यायमूर्ती ललित पुढे म्हणाले की, आदर्शपणे, आपण सकाळी ९ वाजता सुरुवात केली पाहिजे. जर मुले सकाळी सात वाजता शाळेत जाऊ शकतात, तर आपण ९ वाजता काम का सुरू करू शकत नाही. न्यायमूर्ती ललित या वर्षी ऑगस्टमध्ये सरन्यायाधीश बनणार आहेत. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या निवृत्तीनंतर ते २७ ऑगस्ट ते ८ नोव्हेंबर या कालावधीत सरन्यायाधीश असतील.
ते म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ ९ वाजता सुरू झाले पाहिजे आणि ११.३० वाजता अर्ध्या तासाचा ब्रेक असावा. ते पुढे म्हणाले की, त्यानंतर १२ वाजल्यापासून सुरू होऊन २ वाजेपर्यंत सुनावणी घ्यावी. यामुळे ताज्या प्रकरणांसाठी आणि लांबलचक सुनावणी आवश्यक असलेल्या प्रकरणांसाठी संध्याकाळी अधिक वेळ मिळेल.
महत्वाच्या बातम्या-
कोर्टानं नक्की कोणाला दिलासा दिला आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल
न्यायाला विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेनेची नाराजी
उदयपुरमधील हिंदूच्या हत्येला ही भाजप प्रवक्तीच जबाबदार; सर्वोच्च न्यायालयाने झाप झाप झापले
उदयपूरमधील हिंदू युवकाच्या हत्येला सर्वस्वी भाजपची नुपूर शर्मा जबाबदार सर्वोच्च न्यायालयाने झापले






