…अन् पंतप्रधान मोदींनी मला मुख्यमंत्री करुन सगळ्यांची तोंड बंद केली; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कारासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे. eknath shinde on narendra modi)

शिवसेनेसाठी अख्खं आयुष्य खर्ची केलं. मग आम्ही बंडखोर कसे झालो? आमदारांच्या भावना अनेकदा बोलून दाखवल्या त्या ऐकून घेतल्या नाही. सत्तेत असूनही आपला पक्ष चौथ्या क्रमांकावर जात होता. हे पाहून काळीज तुटत होतं. मग शिवसेनेला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

माझ्यासोबत आलेल्या एकाही आमदाराला मी निराश करणार नाही. सर्वांची कामं मार्गी लावणार आहे. काही लोक बोलतात अजूनही मंत्रालय सुरु झालेले नाही. पण मी जिथं जातो तिथं मंत्रालय असतं. सर्व कामं मी एका फोनवर करतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पाहिलं की शिवसेनेच्या उठावातून हे एकत्र आले आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि मला मुख्यमंत्री केलं. मोदींनी असं करुन सर्वांची तोंड बंद केली आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

तसेच नामांतराला स्थगिती दिल्याच्या निर्णयावरही शिंदेंनी भाष्य केलं आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता, तो बेकायदेशीर होता. त्यामुळे आता आम्ही उद्या कायदेशीर पद्धतीने हा निर्णय घेणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

सुरतला गेलो तेव्हा तीन दिवस मी झोपलो नव्हतो. आमदारांची काळजी मला वाटत होती. पण बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सगळं योग्य झालं. मी शब्द दिलाय की ५० पैकी एकही आमदार पडणार नाही, जर पडला तर मी राजकारण सोडून देईल, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
ललित आणि सुष्मिताच्या नात्यावर एक्स बॉयफ्रेंडची धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाला, मनसोक्त हसून घ्या, कारण…
‘फक्त दोनच मुले जन्माला घालण्याच्या कोणत्याही कायद्याचे समर्थन करणार नाही’- असदुद्दीन ओवैसी
काजोलने बॉलिवूडचे ‘ते’ काळे सत्य केले उघड; म्हणाली, २८ इंच कंबर आणि ३६ इंच छाती…