आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये छाप सोडणाऱ्या नीतू चंद्राने सध्या कास्टिंग काउच आणि ऑडिशनचे काळे सत्य लोकांसमोर आणले आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत तिने केलेल्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नीतू चंद्राने २००५ मध्ये ‘गरम मसाला’ या सिनेमातून डेब्यू केला होता.
मुलाखतीत नीतू चंद्राने एका घटनेचा उल्लेख केला ज्यामध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाने तिला मासिक पगारावर पत्नी बनण्याची ऑफर दिली होती. व्यावसायिकाची पत्नी राहण्यासाठी तिला दरमहा २५ लाख पगार तो देणार होता. असे तिने सांगितले.
म्हणाली, खरं तर, १३ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांसोबत काम करूनही माझ्याकडे ना काम होतं ना पैसा. यादरम्यान नीतू अनेक ऑडिशन्स देत होती. एका ऑडिशनमध्ये कास्टिंग डायरेक्टरने तिला तासाभरात रिजेक्ट केल्याचा किस्साही तिने यावेळी सांगितला.
म्हणाली, एका कास्टिंग डायरेक्टरने ऑडिशनदरम्यान अवघ्या तासाभराच्या आत मला सांगितलं की, नीतू मला माफ कर पण मी तुला भूमिका देऊ शकत नाही. मला फार वाईट वाटलं. तिने याबद्दल राग व्यक्त केला आणि म्हणाली, याचा अर्थ त्याने माझा आत्मविश्वास तोडण्यासाठी मला ऑडिशनला बोलावलं आणि त्यानंतर थेट नकार दिला.
नीतूबद्दल अधिक माहिती म्हणजे, नीतूने २००५ मध्ये ‘गरम मसाला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एअर होस्टेसची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ट्रॅफिक सिग्नल, वन टू थ्री, ओय लकी लकी ओय, अपार्टमेंट १३ बी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
नीतू चंद्रा ही शेफाली शाह, राहुल बोस आणि सुमीत राघवन यांच्यासोबत ‘कुछ लव्ह जैसा’ या चित्रपटात शेवटची झळकली. तिने काम केलेल्या ‘ओय लकी लकी ओय’ या चित्रपटाला सर्वांत लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.