आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेमा इंडस्ट्रीत मोठं नाव करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतला जाऊन दोन वर्ष झाली. तरी त्याच्या आत्महत्या प्रकरणाचे गुढ कायम आहे. त्याच्या आत्महत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आजही अनेक चाहत्यांकडून त्याला न्याय मिळण्याची मागणी होत आहे. अशातच सुशांतची बहिण प्रियंका सिंहने मोठे वक्तव्य केले आहे. (Sushant’s death case will heat up again, now the sister made a sensational revelation)
प्रियांका सिंह म्हणते की, त्याच्या मृत्यूनंतर मी त्याची रूम, बेड, पंख्याची उंची या गोष्टी पाहिल्या होत्या. तेव्हा मला समजले होते की, सुशांतने आत्महत्या केलेली नाही, असं धक्कादायक वक्तव्य प्रियांकाने केल्यामुळे या गोष्टीची सर्वत्र चर्चा होतेय.
प्रियंका सिंहने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे की, माझ्या भावाला चांगली ओळखते. माझा भाऊ आत्महत्या करणं शक्यच नाही. मी स्वतः फौजदारी वकील आहे. त्यामुळे मी त्याची रूम, पंखा, पलंगाची उंची या सर्व गोष्टी बघून समजून गेले होते की त्याने आत्महत्या केलेली नाही.
पुढे प्रियांकाने म्हंटले की, माझ्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातील वस्तू हलवण्यात आल्या होत्या. त्याच्या मृत्यूनंतर उंची बद्दलही चुकीचे सांगण्यात आले. त्यादिवशी काय घडले ते सगळ्या जगाने पाहिले आहे. त्या ठिकाणच्या पोलिसांनी तर ते ठिकाण पिकनिक स्पॉट केले होते.
मी रात्री पोहोचले तेव्हा त्या ठिकाणी कोणीही जाऊ शकत नव्हते. तिथे पिवळ्या रंगाची पट्टी लावण्यात आली होती. ती पट्टी काढण्यासाठी ८,९ दिवसांचा वेळ लागला. त्यानंतर मी दरवाजा उघडला आणि पहिल्यांदाच ती खोली पाहिली. तर माझ्या भावाचे घर बदलले होते, असंही ती म्हणाली.
मी सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर समजले की, त्याने आत्महत्या केलेली नाही. मी फौजदारी वकील आहे. अनेक केसेस पाहिल्या आहेत. अनेक फोटो पाहिले आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचे डोळे बाहेर येतात किंवा जीभ बाहेर येते. त्याच्या मृतदेहावरून सर्व गोष्टी स्पष्ट होतात, असं प्रियांकाने म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
ना भाजपमध्ये जाणार, ना शिवसेनेत, शिंदे गटासाठी ‘हा’ पर्याय ठरू शकतो सर्वोत्तम, तयारी झालीये सुरु
मुर्मू यांना मतदान करण्यासाठी भाजपकडून आमदारांना पैशांचं आमिष, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप
वाढत्या वजनामुळे ‘या’ अभिनेत्रीला दाखवला बाहेरचा रस्ता, आता तिनेच केला इंडस्ट्रीचा पर्दाफाश