Share

‘सलमानने मला लग्नासाठी विचारलं तर मी नाही म्हणणार नाही’, अभिनेत्रीचं हैराण करणारं वक्तव्य

बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा इंडस्ट्रीतील सर्वात एलिजिबल बॅचलर आहे. त्याचे लग्न कधी होणार याचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. सलमान खानला कोणावर फिदा आहे हे माहीत नाही, पण देशच नाही तर शेजारील देशातील चाहत्यांनाही त्याची भुरळ पडली आहे. आता पाकिस्तानी अभिनेत्री मीराच घ्या, ती दबंग खानची इतकी वेडी आहे की ती त्याच्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत आहे.

मीराने सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मीराने तिच्या ताज्या मुलाखतीत सलमान खानवरचे प्रेम व्यक्त केले आहे. ती म्हणाली की ती सलमान खानच्या लग्नाचा प्रस्ताव मी नाकारू शकणार नाही. डेली पाकिस्तानच्या रिपोर्टनुसार, मीराला तिच्या मैरिटल स्टेट्सबद्दल विचारण्यात आले. तिने अविवाहित असल्याचे स्पष्ट केले.

सलमान खानने तिला कधी लग्नासाठी प्रपोज केले तर ती नाकारणार नाही हे सांगायला मीरा विसरली नाही. इतकेच नाही तर मीराने सलमान खानला जगातील सर्वात मोठा सुपरस्टार देखील म्हटले आहे. आम्ही आशा करतो की मीराचे हे अफाट प्रेम आणि तळमळ असलेला संदेश सलमान खानपर्यंत पोहोचला असेल.

सलमान खानला मीरामध्ये किती रस आहे हे आता दबंग खानला लवकरच कळेल. तसेच, चाहत्यांची ही क्रेझ सलमान खानसाठी नवीन नाही. प्रत्येक महिला चाहत्यांना सलमानमध्ये तिचा मिस्टर राईट दिसतो. पण, आजपर्यंत एकाही चाहत्याची ही इच्छा पूर्ण झालेली नाही. मात्र चाहत्यांच्या या वेडेपणामुळे त्यांचे सलमानवरील प्रेम स्पष्ट होते.

सलमान खानबद्दल बोलायचे झाले तर त्याचे नाव अनेक महिला अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्याने अनेक हिरोइन्सना डेट केले आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, सोमी अली, संगीता बिजलानी, कतरिना कैफ यांच्या नावांचा समावेश आहे. सलमानचे कोणाशीही नाते लग्नापर्यंत पोहोचले नाही. सध्या सलमान युलिया वंतूरला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमानचे आगामी चित्रपट टायगर ३ आणि कभी ईद कभी दिवाळी हे आहेत. सलमानच्या या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
बिग बॉसच्या नवीन सिझनसाठी सलमानने वाढवली तिप्पट फी, मागितले तब्बल इतके कोटी
20 वर्षात इतकी बदलली सलमान खानची जुडवां मधील रंभा, फोटो पाहून विश्वास बसणार नाही
खान त्रिकुटावर आलीये कॅमिओ रोल करण्याची वेळ, या चित्रपटांमध्ये दिसणार शाहरूख, सलमान, आमिर
..त्यामुळे मी माझ्या प्रत्येक चित्रपटात शर्ट काढतो, इतक्या वर्षांनंतर सलमान खानने उघड केले गुपित

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now