जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘गुड लक जेरी’ (Good Luck Jerry) या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. जान्हवीच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर काही वेळापूर्वीच रिलीज झाला आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जान्हवी जया कुमारी उर्फ जेरी आहे आणि तिची निरागस शैली या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा दिसून आली आहे.(Janhvi Kapoor, Sridevi, Good Luck Jerry, Siddharth Sen Gupta, Anand L Rai)
दिग्दर्शक सिद्धार्थ सेन गुप्ता यांच्या या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय करत आहेत. मात्र, जान्हवीचा हा चित्रपट सिनेमागृहांऐवजी थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘गुड लक जेरी’ २९ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर आहे.
जान्हवी कपूर म्हणजेच जेरी ही बिहारची असून कामाच्या शोधात पंजाबमध्ये येते असे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. आई आजारी आहे आणि अनेक प्रयत्न करून, आता जेरी ड्रग्स विकणाऱ्या लोकांकडे काम मागण्यासाठी पोहोचते. निरागस दिसणारी जेरी या कामात सहभागी होईल याची कल्पनाही कोणी करू शकत नाही, पण एवढी निरागस दिसणारी जेरी खरच केवळ सक्तीने या धंद्यात सामील होतीये की यामागचं कारण काही वेगळं आहे, हे पाहण्यात मजा येईल.
या चित्रपटाबाबत निर्माता आनंद एल राय म्हणाले की, चित्रपटाच्या माध्यमातून नैतिकता आणि जीवनातील दु:ख यात डोलणाऱ्या सामान्य माणसाचे जीवन आम्ही दाखवले आहे. चित्रपटात कॉमेडी आणि ड्रामाचा मिलाफ प्रेक्षकांना पाहायला आवडेल. आता प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दिग्दर्शक सिद्धार्थ सेन म्हणाले की, बॉलिवूडमध्ये फार कमी कॉन-कॉमेडी बनल्या आहेत ज्यात अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला कॉन-मेन या शब्दाची व्याख्या बदलायची आहे. जान्हवीचा हा पहिलाच ओटीटी रिलीज झालेला चित्रपट आहे. चित्रपटगृहांमध्ये तिचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट रुही हा एक हॉरर कॉमेडी होता.
जान्हवीने कोरोनाच्या काळात पंजाबमध्ये या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. या शूटिंगदरम्यान तिला पंजाबमधील शेतकऱ्यांच्या विरोधालाही सामोरे जावे लागले होते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जान्हवी कपूर आणि तिची मैत्रिण सारा अली खानसोबत करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये दोन्ही अभिनेत्रींमधील केमिस्ट्री पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
बिग बॉसच्या नवीन सिझनसाठी सलमानने वाढवली तिप्पट फी, मागितले तब्बल इतके कोटी
पुरुषाला आली मासिक पाळी, तपासणी करताच शरीरात आढळला गर्भाशय, डॉक्टरही झाले अवाक
सारा अली खानच्या प्रपोजलला विजय देवरकोंडाने दिले हे उत्तर, फोटो सोशल मिडीयावर व्हायरल
राज्यात पावसाचा हाहाकार! आतापर्यंत ७६ लोकांचा मृत्यु, तर १२५ जनावरांनीही गमावला जीव