Share

हॉटेलने सर्विस चार्ज लावला तर डायरेक्ट करा ‘या’ नंबरवर तक्रार, मालकावर होणार कारवाई

आधी कोरोना आणि आता महागाई यामुळे हॉटेलमध्ये जाऊन मस्त जेवणावर ताव मारण्याचा आनंद लोकांना महागला आहे. त्यात हॉटेलमध्ये सर्विस चार्जच्या नावाखाली भरपूर लूट ग्राहकांची होते. त्यामुळे सुद्धा ग्राहक हैराण झाले आहेत. (If the hotel charges a service charge, direct the complaint to this number)

हॉटेल, रेस्टॉरंट चालकांकडून होणाऱ्या लूटीला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने कडक पाऊले उचलली आहे. असे प्रकार लगेच थांबवण्याचा इशारा त्यांनी हॉटेल चालकांना दिला आहे.

अशा प्रकारे तुमची फसवणूक होत असल्यास लगेच आमच्या हेल्पलाईन नंबरवर किंवा ईमेल आयडी तक्रार करावी, असे आवाहन केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने ग्राहकांना केले. गरज पडल्यास १९१५ या नंबरवर ग्राहकांनी तक्रारीसाठी संपर्क साधावा. अथवा NCH हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊलोड करून त्याद्वारे तक्रार नोंदवता येते, असे म्हंटले आहे.

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) सर्व्हिस चार्ज आकारण्यासंदर्भात आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी नियम तयार केले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटच्या अन्न बिलांमध्ये स्वयंचलितपणे, डिफॉल्टनुसार कोणतेही चार्ज (पैसे) वसूल करू नये, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

कोणतेही हॉटेल, रेस्टॉरंट ग्राहकाला सर्विस चार्ज देण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. सर्विस चार्ज ऐच्छिक आहेत. ग्राहकाची ईच्छा असल्यास तो सर्विस चार्ज देईल अन्यथा देणार नाही. परंतु त्याच्यावरती हेच चार्जेस लादल्यावर त्याला याची तक्रार करता येते.

हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कसल्याही प्रकारचे अवाजवी सेवा शुल्क अर्थात सर्विस चार्ज ग्राहकांकडून वसूल करत त्यांची फसवणूक करू नये. अशा स्पष्ट सूचना केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने संपूर्ण देशभरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
..त्यामुळं बायको मुलीला घरात डांबून CRPF जवानाने स्वत:ला मारली गोळी, घटनेने खळबळ
ठाकरेंनी हकालपट्टी करताच गद्दार आमदार बांगरांचे थेट पक्षप्रमुखांना आव्हान, म्हणाले तुम्हाला तो हक्क नाही
कौतुकास्पद! पुण्यातील ‘हा’ मुस्लिम तरुण दरवर्षी देतोय ‘आर्थिक कुर्बानी’, हजारो विद्यार्थ्यांना करतोय मदत

ताज्या बातम्या आरोग्य इतर

Join WhatsApp

Join Now