Share

सचिनने गांगुलीच्या खोलीत भरले होते पाणी, तरंगणारी सुटकेस पाहून गांगुली झाला होता हैराण

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची मैत्री अनेक टप्प्यांतून गेली आहे. लहानपणी एकत्र क्रिकेट खेळण्यापासून ते भारतीय संघात स्थान मिळवण्यापर्यंत ते सोबतच होते. त्यानंतर, त्यांनी मिळून शंभर भागीदारी केल्या आणि आता गांगुलीला बीसीसीआय अध्यक्ष म्हणून पाहणे ही आनंदाची गोष्ट आहे. दोघांनी अनेक वर्षांपूर्वी क्रिकेट जगताचा निरोप घेतला, पण त्यांची मैत्री अजूनही कायम आहे.(Sachin Tendulkar, Sourav Ganguly, Cricket, BCCI President)

गांगुली शुक्रवारी ५० वर्षांचा होत आहे. वाढदिवसापूर्वी सचिन तेंडुलकरने अनेक आठवणी शेअर केल्या. सचिनने सांगितले की, जेव्हा तो भारताचा कर्णधार होता, तेव्हा गांगुलीत कर्णधार बनण्याची क्षमता अधिक असल्याचे त्याने पाहिले. याच कारणामुळे त्यांनी गांगुलीला उपकर्णधारपदासाठी बढती दिली आणि नंतर कर्णधारपद सोडले, त्यानंतर गांगुलीला भारताची कमान मिळाली.

पाच वर्षे भारताचा कर्णधार असताना गांगुली आपल्या खेळाडूंना किती सवलत देत असे, असा प्रश्न सचिनला विचारण्यात आला. तर त्याला उत्तर देताना सचिन म्हणाला, “सौरव एक उत्तम कर्णधार होता. त्याला संतुलन कसे राखायचे हे माहीत होते. खेळाडूंना किती मोकळीक द्यायची आणि त्यांच्यावर किती जबाबदाऱ्या टाकायच्या हे त्या चांगल्याप्रकारे माहित होते. तो कर्णधार झाला तेव्हा भारतीय संघ एका टप्प्यातून गेला. आम्हाला अशा खेळाडूंची गरज होती, जे भारताला सामने जिंकून देऊ शकतील आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेतील.

सचिनच्या मते, गांगुलीने अनेक जागतिक दर्जाच्या खेळाडूंना पुढे येण्यास मदत केली. तो म्हणाला, त्यावेळी आम्हाला अनेक महान खेळाडू मिळाले. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, हरभजन सिंग आणि आशिष नेहरा हे त्यापैकीच एक आहेत. ते सर्व प्रतिभावान खेळाडू होते, पण या खेळाडूंनाही त्यांचे करिअर घडवण्यासाठी पाठिंब्याची गरज होती, सौरव गांगुलीने तो त्यांना दिला.

सचिन म्हणाला, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी कर्णधार होतो आणि उपकर्णधारपदासाठी मी सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. मी त्याला याआधी जवळून पाहिले होते, त्याच्यासोबत क्रिकेट खेळले होते आणि मला माहित होते की त्याच्याकडे भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची क्षमता आहे. तो एक चांगला कर्णधार होता, म्हणूनच मी त्याचे नाव पुढे केले. त्यानंतर सौरवने मागे वळून पाहिले नाही आणि कर्णधार म्हणून त्याने काय मिळवले ते आपण सर्व पाहू शकतो.

सचिन आणि गांगुली ही जोडी मैदानाबाहेरही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेत होती. त्यामुळेच भारताला त्याच्यापेक्षा चांगली जोडी मिळाली नाही. या दोघांनी मिळून २६ शतकी भागीदारी केली असून यातील २१ भागीदारी सलामीवीर म्हणून केल्या आहेत. यावर सचिन म्हणाला, “मी आणि सौरवने आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले. आम्हाला संघाच्या गरजेनुसार योगदान द्यायचे होते आणि भारतासाठी सामने जिंकायचे होते. त्याशिवाय आम्ही इतर कशाचाही विचार केला नाही. आम्ही लोकांचे आभारी आहोत की त्यांच्यामुळे आम्हाला भारताची सर्वोत्तम सलामी जोडी मानली जाते.”

सचिन म्हणाला, १९९१ च्या दौऱ्यात सौरव आणि मी एकाच खोलीत राहिलो. तो आमचा एकमेकांसोबतचा चांगला वेळ होता. आम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखत होतो. यामुळे आमच्यात चांगली मैत्री होती. सचिनने सांगितले की, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेकदा गांगुलीसोबत वेळ घालवला आहे, पण जेव्हा तो इंदूरमध्ये अंडर-१५ कॅम्पमध्ये एकत्र होता, तेव्हा तो काळ सर्वोत्तम होता.

सचिन तेंडुलकरने सांगितले की, त्याने त्याच्या दोन मित्रांसह गांगुलीच्या खोलीत पाणी भरले. सचिनसोबत जतीन प्रांजपे आणि केदार गोडबोले होते. दुपारी गांगुली झोपला असताना या तिघांनी मिळून गांगुलीच्या खोलीत पाणी भरले. त्याला जाग आल्यावर काही वेळ काय चालले आहे ते कळलेच नाही. शूटकेस पाण्यात तरंगताना पाहून तो आश्चर्यचकित झाला, पण नंतर त्याला सचिन, जतीन आणि केदारचा हात असल्याचे सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-
सलग दोन सिजन बेंचवरच बसून असलेल्या अर्जुनला वडील सचिन तेंडुलकरने दिला हा सल्ला
सचिन तेंडुलकरचा मुलाला खास सल्ला; म्हणाला, अर्जुन मेहनतीचे परिणाम कधी ना कधी समोर येतील
IPL 2022: डेथ ओव्हर्समध्ये हा गोलंदाज सर्वात धोकादायक, सचिन तेंडुलकरने केले तोंडभरून कौतुक
वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरने शेअर केले खास फोटो; म्हणाला, ही आहेत माझी खास माणसं

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now