बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत असते. आता तिने आणखी एक खळबळजनक विधान केलं आहे. तिने आपल्या इन्स्टग्रामवर पोस्ट टाकत बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्याला टार्गेट केलं आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे.
तिने ज्या दिग्दर्शक-निर्मात्याला टार्गेट केलं आहे, तो त्यांच्या दोघांच्या जुन्या वादावर आधारित आहे. नेमका हा वाद कोणता होता? आणि तिची नेमकी पोस्ट काय आहे, तसेच हा दिग्दर्शक नेमका कोण आहे याबद्दल तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. तर जाणून घेऊयात.
अभिनेत्री कंगना रानौत हिचा ज्या दिग्दर्शकासोबत वाद आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून, करण जोहर आहे. त्या दोघांमध्ये छत्तीसचा आकडा आहे. कंगणाने नेहमीच करण जोहरला टार्गेट केले आहे. आता पुन्हा एकदा तिने इन्टाग्रामवर स्टोरी टाकत करण जोहरवर टीका केली आहे.
करण जोहरचा प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण ७’ आजपासून नेटफ्लिक्सवर सुरू होत आहे. हे निमित्त साधत कंगणाने जूना वाद उरकून काढत पून्हा एकदा करण जोहरवर टीका केली आहे. त्यासंदर्भात तिनं पोस्ट टाकत करण जोहरवर निशाणा साधला आहे.
तिने पोस्ट केली आहे की, ‘पापा जोचे (करण जोहर) कॉफी एपिसोड्स आजपासून OTT वर प्रीमियर होणार आहेत. पापा जो यांना हार्दिक शुभेच्छा. पण या एपिसोडचे काय? अरे सॉरी. सर्जिकल स्ट्राईक, घरात घुसून मारलेले ना, माझा हा सर्वात लोकप्रिय एपिसोड होता, तरीही टीव्हीवर बॅन करण्यात आला होता, असे कंगणा राणौतने पोस्ट केले. हे तिचे जुनेच पोस्ट आहे.
हे पोस्ट पुन्हा एकदा टाकत तिने करण जोहरला टार्गेट केलं आहे. कंगना रानौतने तिच्या इंस्टा स्टोरीवर एका न्यूज पोर्टलवर प्रकाशित करणच्या लेखाचा स्क्रीनशॉट टाकला आणि तिने करणला लोकप्रिय केल्याचे सांगितले. कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘त्याच्या सर्व कामांपेक्षा मी त्याला अधिक लोकप्रिय केले आहे.’
आता नेमका कंगणाचा हा जुना वाद म्हणजे, ‘कॉफी विथ करण’च्या ५ व्या सीझनमध्ये कंगणा रणौतने हजेरी लावली होती. कंगना ‘रंगून’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पोहोचली होती. तिच्यासोबत सैफ अली खानही दिसला होता.
बॉलिवूडमधील घराणेशाहीला पाठींबा देत असल्याचा आरोप तिने करण जोहरवर लावला होता. तसेच तिने करणची क्लास लावत त्याची बोलती बंद केली होती. नंतर हा एपिसोड बॅन करण्यात आला होता. या वादानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती.