अमेरिकेने ४ जुलै रोजी आपला २४६ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. संपूर्ण अमेरिकेप्रमाणे शिकागोमध्येही लोक स्वातंत्र्याच्या जल्लोषात मग्न होते, तेवढ्यात अचानक चेंगराचेंगरी झाली आणि इथे संपूर्ण हाईलँडर पार्क (HIGHLAND PARK, Ill) गोळ्यांच्या आवाजाने गुंजले. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे धावू लागले. गोळीबारामुळे अवघ्या १० मिनिटांत परेड थांबवावी लागली. या गोळीबारात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ३६ जण जखमी झाले आहेत.(Shooting, Independence Day, USA, Highlander Park, Parade)
अमेरिकेत गोळीबार काही नवीन नाही. अलीकडेच येथील एका शाळेत झालेल्या गोळीबारात अनेक मुलांसह २१ जणांचा मृत्यू झाला होता. आता स्वातंत्र्यदिनी शिकागोमध्ये झालेल्या गोळीबाराने सर्वांनाच धक्का बसला आहे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे वय केवळ २२ असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी आरोपी रॉबर्ट ई. क्रिमो III याला ताब्यात घेण्यात आले आहे. परेडवर आरोपींनी टेरेसवरून गोळीबार केला. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता परेड सुरू झाली. मात्र गोळीबारामुळे १० मिनिटांत परेड थांबवण्यात आली. याशिवाय शिकागोमध्ये इतर ठिकाणी हिंसाचाराच्या भीतीने परेड रद्द करण्यात आली.
आरोपीला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३६ जण जखमी झाले आहेत. आरोपीने जवळपास २०० राउंड फायर केल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी कारमधून पळून जात होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला घेराव घातला.
परेड सुरू झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच गोळीबार सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इथे रक्ताने माखलेले मृतदेह पडले होते. लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते. परेड पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मुलांसह आले होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र गोळीबारामुळे लोक आपल्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी हल्ल्याच्या ठिकाणाहून धावताना दिसले.
रॉबर्ट ई क्रेमो III असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. तो फक्त २२ वर्षांचा आहे. मात्र हा हल्ला का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमींचे वय ८ ते ८५ वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. गोळीबाराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. पोलिसांनी एक बंदूकही जप्त केली आहे.
येथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासाठी आलो होतो, पण ही घटना बघायला मिळाली. त्यामुळे खूप नुकसान झाले आहे, लोकांना जीव गमवावा लागला आहे. आम्ही दहशतवादाशी लढत आहोत.
हायलँड पार्कचे रहिवासी असलेले ७३ वर्षीय माइल्स झेरेमस्की देखील परेड पाहण्यासाठी आले होते. त्याने सांगितले की, अचानक गोळ्यांचे आवाज येऊ लागले. मी याआधी सैन्यात आहे, त्यामुळे गोळीबाराचा आवाज मी ओळखतो. त्याचवेळी आणखी एका व्यक्तीने सांगितले की, सुरुवातीला आम्हाला फटाक्यांचा आवाज वाटत होता. मात्र अचानक चेंगराचेंगरी झाली. मग मी पुढे गेलो, रस्त्यावर मृतदेह पडलेले दिसले. तो म्हणाला, हे भयानक होते. मी यापूर्वी असे काहीही पाहिले नाही. लोक रक्ताने माखले होते.
महत्वाच्या बातम्या-
बहिणीप्रमाणे त्याला करायची होती देशसेवा, पण पोलिसांच्या गोळीबारात झाला मृत्यू; जाणून घ्या राकेशची कहाणी
उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला आणि गोळीबार; अग्नीपथ योजनेविरोधातील आंदोलन पेटले
पुण्यात लष्करी जवानाचा कोर्टाच्या आवारातच बायको-सासूवर गोळीबार; बायको ठार तर सासुची मृत्यूशी झुंज
१८ वर्षीय मुलगा रायफल घेऊन शाळेत आला आणि गोळीबार करत १९ लहान मुलांना ठार मारलं