..त्यामुळे मी माझ्या प्रत्येक चित्रपटात शर्ट काढतो, इतक्या वर्षांनंतर सलमान खानने उघड केले गुपित

बॉलिवूड इंडस्ट्रीमधून आपल्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ‘टायगर ३’, ‘कभी ईद कभी दिवाळी’नंतर लवकरच तो ‘नो एंट्री २’ आणि अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. दरम्यान, सलमानने असेही सांगितले की तो बिग बॉस देखील होस्ट करणार आहे. त्याचवेळी, सलमानचे चाहतेही त्याच्या चित्रपटांसह बिग बॉस १६ च्या आगमनाची वाट पाहत आहेत. दरम्यान, सलमानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(Salman Khan, Bollywood Industry, Tiger 3, Shirt)

https://twitter.com/filmygyanimages/status/1533472842729521152?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1533472842729521152%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.patrika.com%2Fbollywood-news%2Fsalman-khan-takes-off-his-shirt-in-films-7618483%2F

व्हिडिओमध्ये, सलमान खानने त्याच्याशी संबंधित एक मोठे रहस्य उघड केले आहे. चाहत्यांना अनेकदा जाणून घ्यायचे असते की सलमान त्याच्या प्रत्येक चित्रपटात शर्ट का काढतो? हा व्हिडिओ नुकत्याच झालेल्या आईफा पुरस्कार २०२२ (IIFA 2022) मधला आहे. सलमानने त्याच्या या मोठ्या गुपितावरून स्वतः पडदा उचलला आहे.

आईफा पुरस्कार २०२२च होस्टिंग रितेश देशमुख आणि मनीष पॉल यांनी केल होत. दरम्यान, एका सत्रात सलमानने काही प्रश्नांची उत्तरे दिली. इव्हेंटमध्ये रितेश आणि मनीषने लोकांना सलमानशी संबंधित काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे खुद्द सलमाननेच दिली. सर्वप्रथम ‘सलमान खान त्याच्या चित्रपटांमध्ये शर्ट का काढतो?’, असे विचारण्यात आले. याचे उत्तर तिथे उपस्थित असलेल्या अनेकांना विचारण्यात आले.

ऑडीयंसमध्ये बसलेल्या जेनेलिया देशमुखला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा ती म्हणते, ‘कारण ते खूप कूल आहेत’. मात्र सलमानने हे उत्तर चुकीचे म्हटले आहे. यावर सलमान मनीषला म्हणतो की, ‘तुझ्याकडे महागडी आणि आलिशान कार असेल, तर ती तू झाकून ठेवशील का?’, त्यावर मनीष म्हणतो, ‘नाही सलमान भाई, मी खूप वापरणार आणि खूप शो ऑफ करणार’.

मनीष पॉलच्या या बोलण्यावर सलमान हसला. यादरम्यान सलमानने शाहरुख खानबद्दल एक मोठी गोष्टही सांगितली. रितेश आणि मनीषने विचारले, ‘तुम्ही तुमच्या डेविलच्या मागे आहात, मग तुमच्या मागे कोण आहे?’, ज्यावर सलमान खानने उत्तर दिले की ‘माझ्या मागे ‘पठाण’ आहे, माझ्या मागे ‘जवान’ आहे. सलमान खानने कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांची मने जिंकली.

महत्वाच्या बातम्या-
बाबो! या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये १० अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार सलमान खान, अशी असेल भूमिका
बिश्नोई गँगने या कारणामुळे दिली होती सलमान खान अन् त्याच्या वडिलांना धमकी, चौकशीत मोठा खुलासा
आम्ही कुणाच्या बापालाही घाबरत नाही, धमक्या मिळाल्यानंतरही बिनधास्त शुटींग करतोय सलमान खान
सलमान खानला मिळालेल्या धमकीची झाली उकल; पोलिसांच्या हाती लागला धमकी देणारा आरोपी