‘द फॅमिली मॅन २’ आणि अल्लू अर्जुन स्टारर ‘पुष्पा’ या चित्रपटातील ‘उ अंटावा’ या डान्स नंबरच्या बंपर यशानंतर टॉलिवुड चित्रपट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) देखील हिंदी प्रेक्षकांमध्ये एक प्रसिद्ध नाव बनले आहे. तेव्हापासून अभिनेत्रीशी संबंधित कोणतीही बातमी काही मिनिटांत व्हायरल होऊ लागते. पती नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.
यासोबतच या अभिनेत्रीच्या बॉलिवूड डेब्यूवरही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यशोदा चित्रपटाच्या माध्यमातून पॅन इंडिया चित्रपट घेऊन ही अभिनेत्री हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. मात्र बातमी अशी आहे की याशिवाय अभिनेत्रीच्या हातात एक मोठा चित्रपट आला आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सुपरस्टार सलमान खानच्या आगामी कॉमेडी जॉनर चित्रपट ‘नो एन्ट्री २’ मध्ये दिसू शकते.
मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी साऊथ सिनेसृष्टीतील ४ बड्या अभिनेत्रींच्या नावाची चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये समंथा रुथ प्रभू, रश्मिका मंदान्ना, पूजा हेगडे आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची नावे समोर आली आहेत. या चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने बॉलिवूड लाईफला सांगितले आहे की, नो एंट्री २ या चित्रपटात या चौघींना कास्ट केले जाऊ शकते.
‘नो एंट्री २’ या चित्रपटात सलमान खानशिवाय अनिल कपूर आणि फरदीन खान मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ज्यामध्ये फरदीन खान तिहेरी भूमिका साकारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास १० अभिनेत्री या चित्रपटात एन्ट्री करणार आहेत. ज्यामध्ये या चार दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या नावावर विचार केला जात आहे. या अभिनेत्री साऊथ सिनेसृष्टीतील बड्या स्टार्स आहेत. यामुळे चित्रपटाला पॅन इंडिया स्तरावर सहज प्रवेश मिळेल.
समंथा रुथ प्रभू आणि रश्मिका मंदान्ना यांनी पुष्पा चित्रपटाद्वारे उत्तर भारतीय प्रेक्षकांमध्ये यापूर्वीच लोकप्रियता मिळवली आहे. तर पूजा हेगडे सुपरस्टार सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटात काम करत आहे. अशा परिस्थितीत तिची या चित्रपटात एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, तमन्ना भाटिया हिम्मतवाला आणि बाहुबलीमुळे उत्तर भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
महत्वाच्या बातम्या-
बाबो! या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये १० अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार सलमान खान, अशी असेल भूमिका
बिश्नोई गँगने या कारणामुळे दिली होती सलमान खान अन् त्याच्या वडिलांना धमकी, चौकशीत मोठा खुलासा
आम्ही कुणाच्या बापालाही घाबरत नाही, धमक्या मिळाल्यानंतरही बिनधास्त शुटींग करतोय सलमान खान
या माणसामुळे वाचला सलमान खानचा जीव, नाहीतर बंगल्याबाहेरच झाली असती त्याच्यावर फायरिंग