शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. त्यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया देत, शिवसेनेला टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्विट केलं होतं. यावर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी शिवसेनेला टोला लगावला. म्हणाले की, जर मला उमेदवारी दिली असती तर एवढा खेळखंडोबा झाला नसता.
तसेच म्हणाले, जे कोणाचे सरकार येईल त्याने सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि समजातील प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. राज्यात जे १५ ते २० दिवसात घडतंय, ते बरोबर झालेलं नाही. जर मला पुरस्कृत हळद दिली असती तर आज जो खेळखंडोबा झाला आहे तो झाला नसता असे संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे यांनी असे विधान करण्यामागे कारण म्हणजे, राज्यसभा निवडणुकीची सहावी जागा अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केलं होतं. पण राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी पत्र लिहिलं होतं.
त्यानंतर शिवसेनेने सुद्धा या जागेवर निवडणूक लढण्याचं जाहीर केलं, आणि संभाजीराजेंना शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची ऑफर दिली. पण, संभाजीराजेंकडून कुठलीच प्रतिक्रिया न आल्याने अखेर शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली होती.
पुढे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून राजेंनी उमेदवारी करावी हा पर्याय देण्यात आला होता, मात्र कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची. पण घोडेबाजार होणार, घोडेबाजारासाठी माझी उमेदवारी नाही. माझं निष्कलंक असं व्यक्तिमत्त्व आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नाही. असे संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं होतं.