Share

३ मुलांची आई असलेल्या अभिनेत्रीने केलं न्युड फोटोशुट, फोटो पाहून म्हणाल, ‘काय फिटनेस आहे’

ज्या अभिनेत्रीला तिच्या बॉडी शेपमुळे लोकांनी ट्रोल केले, आज त्याच अभिनेत्रीने आपले एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी न्यूड फोटोशूट दिले आहेत. तिने तिचे हे फोटो इन्स्टग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तिचे न्यूड फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी न्यूड फोटो देणारी ही अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री हिलरी डफ आहे. तिने वुमेन्स हेल्थ मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी स्वतः चे न्यूड फोटो दिले आहेत. या मासिकाच्या मुखपृष्ठावर, हिलरी तिची परफेक्ट टोन्ड बॉडी आणि टॅटू फ्लॉंट करताना दिसत आहे.

हाऊ आय मीट युवर फादर फेम अभिनेत्रीने या मासिकाच्या फोटोशूटसह बॉडी इमेजच्या समस्यांबद्दल सांगितले आहे. हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिने एक पोस्ट लिहिली आहे. या अभिनेत्रीला तिच्या बॉडी इमेजबद्दल अनेकदा ऐकायला मिळाले आहे, ज्याला हिलरीने आता तिच्या जबरदस्त न्यूड फोटो शूटद्वारे उत्तर दिले आहे.

हिलरी डफने लिहिले आहे की,  मी बॉडी इमेजबद्दल अनेकदा ऐकलं आहे. ज्याचे उत्तर मी या फोटोशूटमधून दिलं आहे. माझ्या करिअरमुळे… मी स्वतःला मदत करू शकत नव्हती असं करण्याशिवाय … मी कॅमेरावर असायचे आणि एक्ट्रेसेज स्क‍िनी आहेत. ती वयाच्या १७ व्या वर्षी खाण्याच्या विकारातून गेली होती, असे तिनं लिहिले.

हिलरी तीन मुलांची आई आहे आणि आता ती तिच्या शरीरामुळे खूप आरामदायक फिल करते.  ती म्हणते की, मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. तीन मुलांना जन्म दिल्याचा मला अभिमान आहे. मी अशा ठिकाणी पोहोचले आहे जिथे माझ्या शरीरात झालेल्या बदलांमुळे मी निश्चिंत आहे.

मी हे देखील नमूद करू इच्छिते की, फोटोशूट दरम्यान, मेकअप आर्टिस्टने माझ्या संपूर्ण शरीरावर चमक आणली आणि मला सर्वोत्तम स्थितीत पोझ करण्यास मदत केली. हिलरी लुका दहा वर्षे, बँक्स तीन वर्षे आणि माई दोन वर्षे अशी तिच्या तीन मुलांची नावे आहेत.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now