Share

प्रकाश आमटेंचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत मुलाने दिली महत्वाची अपडेट, म्हणाला, परत रक्ताच्या सर्व…

जेष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रकाश आमटे यांना दुर्मिळ असा हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सर झाला आहे. त्यांचे यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र आता त्यांच्या प्रकृतीबद्दल नवीन माहिती समोर येत आहे.

प्रकाश आमटे यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत प्रकाश आमटे यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश आमटे यांची तब्येत आता बरी झाली असून, त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. २-३ दिवसांनी चेक अप होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करण्यात येतील.

ब्लड values ठीक असल्यास पुढच्या आठ दहा दिवसांत किमो थेरपी सुरू करण्यात येईल. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. यात पोस्टमध्ये प्रकाश आमटे यांच्या जवळ एक छोटीशी मुलगी देखील बसलेली बसत आहे. त्यावर देखील अनिकेत आमटे यांनी लिहिले की, बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण आहेत बाबा.

तसेच काल महाराष्ट्र बोर्डचा दहावीचा निकाल लागला. लोक बिरादरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेले गुण देखील त्यांनी सांगितले आहेत. दहावीत उत्तम गुण मिळणाऱ्या आश्रम शाळेतील पाच मुलांची नावं आणि त्यांना मिळलेले गुण याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे.

त्यांनी लिहिले आहे की, एकूण निकाल ८३ टक्के लागला आहे. कॉपी मुक्त निकाल आहे. त्यामुळे ज्यांनी अभ्यास केला ती पास झालीत. सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश न होता चांगला अभ्यास करून पुढील परीक्षेत यश संपादन करावे यासाठी शुभेच्छा.

https://www.facebook.com/100044230369322/posts/575276277290046/?app=fbl

प्रकाश आमटे यांच्याबद्दल माहिती म्हणजे, प्रकाश आमटे हे पद्मश्री विजेते बाबा आमटे यांचे सुपुत्र आहेत. प्रकाश आमटे यांना समाजकार्याबद्दल पद्मश्रीसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या ४९ वर्षांपासून ते गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे महारोगी सेवा समितीच्या लोकबिरादरी प्रकल्प या नावाने आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवत आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now