सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोलो येथील हा व्हिडिओ आहे. हॉटेलात पार्टी केल्यानंतर बिल दिले नसल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाने थेट माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा ताफा आडवला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
२०१४ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री सदाभाऊ यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सदाभाऊंनी कार्यकर्त्यांना खुश ठेवले. मात्र आता तेच खोत यांच्या चांगलच अंगलट आल्याच पाहायला मिळत आहे. हॉटेल मालकाने थेट खोत यांच्या गाड्यांच्या ताफा अडवला.
एवढच नाही तर, त्या हॉटेल मालकाने खोत यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला आहे. मांजरी येथील अशोक शिनगारे असे या व्यक्तीचे नाव आहे. ‘सदाभाऊ २०१४ चे हॉटेल बिल आहे ते द्या आणि पुढे जावा,’ असे म्हणत त्या व्यक्तीने खोत यांना रोखले आहे. यावेळी तेथे बाचाबाची देखील झाली.
यावर आता खोत यांनी थेट पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. ‘माझा प्रचार करणारे कार्यकर्ते, पक्षाचे लोक घरातील भाकरी बांधून प्रचार करत होते. माझा एकही कार्यकर्ता त्या काळात हॉटेलमध्ये चहा देखील घेत नव्हता. कारण आमच्याकडे पैसेही नव्हते.,’ असं खोत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं.
तसेच पुढे बोलताना खोत यांनी या राष्ट्रवादीला लक्ष केलं आहे. ‘या प्रकरणामागे राष्ट्रवादीचा नेता आहे. परंतु, टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या या टोमॅटोला सांगतो की असं षडयंत्र रचून सदाभाऊचा आवाज दाबता येणार नाही. याचा शोध मला लागला, पण पोलिसांना अजून का लागला नाही? असा सवाल खोत यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, खोत यांचं ताफा अडवणारा अशोक शिंगारे हा मोठा गुन्हेगार असल्याच मला कळलं आहे असं यावेळी बोलताना खोत यांनी संगितलं. शिंगारे यांच्या विरोधात सात गुन्हे दाखल आहेत. तो दारू विक्रेता असल्याची माहिती देखील सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. याचबरोबर सध्या शिंगारे यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
नाकातून रक्त येत असल्याने सोनिया गांधी रुग्णालयात दाखल, धक्कादायक माहिती आली समोर
नुपूर शर्मांची जीभ कापणाऱ्याला एक कोटी देण्याची केली घोषणा, भीम आर्मीच्या प्रमुखाला अटक
आघाडीत बिघाडी! शिवसेनेला समर्थन दिलेल्या अपक्ष आमदाराकडे राष्ट्रवादीची मताची मागणी; मुख्यमंत्री भडकले
फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे..! मुलाला धमकी आल्यावर वसंत मोरे खवळले