गर्भधारणा टाळण्यासाठी सध्या विविध पर्याय महिलांकडे उपलब्ध असतात. गर्भधारणा टाळण्यासाठी फक्त गोळ्या खाणे, कॉन्डम वापरणे एवढेच उपाय नसून तुम्ही आता नैसर्गिक पद्धती देखील वापरू शकता. त्यामुळे तुम्हालाही आता आई व्हायचं नसेल तर यासाठी आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक उपाय सांगणार आहोत.
नैसर्गिकरित्या गर्भधारणा रोखण्याच्या या पद्धतीला ‘रिदम मेथड’ म्हणतात. ही पद्धत वापरून तुम्ही गर्भधारणा टाळू शकता. गर्भधारणा टाळण्यासाठी रिदम मेथड हा एकमेव मार्ग आहे, ज्यामध्ये स्त्रीला तिच्या मासिक पाळी आणि प्रजनन कालावधीचा ट्रॅक ठेवणं गरजेचं आहे.
याच रिदम मेथडला कॅलेंडर मेथड देखील म्हटलं जातं. स्त्रिया महिन्याच्या काही दिवसांमध्ये सर्वात जास्त प्रजननक्षम असतात, म्हणजेच त्या वेळी गर्भधारणेची शक्यता खूप जास्त असते. जर नैसर्गिक रित्या गर्भधारणा टाळायची असेल तर फर्टाइल कालावधीत सेक्स करण टाळालं पाहिजे.
आजकाल अनेक महिला या फर्टिलिटी पीरियडमध्येही लैंगिक संबंध ठेवतात आणि यानंतर गर्भधारणा टाळण्यासाठी या दिवसांत गर्भनिरोधक गोळ्या घेतात. मात्र जास्त प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्या देखील महिलेच्या शरीरासाठी चांगल्या नसतात. गोळ्यांचा अतिरिक्त वापर शरीरावर विपरीत परिणाम करू शकतात.
आता रिदम मेथडमध्ये स्त्रीला तिचं ओव्हुलेशन कधी होणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचे असतं. मासिक पाळीत ओव्हुलेशन ही अशी वेळ असते जेव्हा तुमच्या अंडाशयातून एग रिलीज होतात. या काळात सेक्स केल्याने स्पर्म एगला फर्टिलाइज करतात, ज्यामुळे तुम्ही गर्भवती होण्याची शक्यता असते.
अशा स्थितीत रिदम पद्धतीचा वापर करणाऱ्या महिलांना महिन्यातील कोणते दिवस फर्टाइल होतील हे जाणून घेण्यासाठी त्यांची शेवटची मासिक पाळी येण्याच्या वेळेवर लक्ष ठेवावं लागेल. त्यासाठी मासिक पाळीच्या तारखा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे ही नैसर्गिक पद्धत वापरून तुम्ही तुमची गर्भधारणा टाळू शकता.