अंबानी-अदानींचा फोटो पोस्ट करुन मिटकरींचा फडणवीसांना टोला; म्हणाले, अहो दाजी हेच का ते…

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देहूत आले होते. त्यांच्या हस्ते शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी भाषण देत लोकांना संबोधित केलं. (amol mitkari criticize devendra fadnvis)

या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पुस्तकाचेही प्रकाशन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. पण ते सर्वात जास्त चर्चेत संत तुकारामांचे अभंग गायले यामुळे आले. त्यांनी तुकारामांचा जे की रंजले गांजले हा अभंग गाऊन दाखवला.

आता नरेंद्र मोदींनी अभंग गायला यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. तसेच ट्विट करत रंजले गांजले कोण आहेत? असा सवालही अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

मोदींच्या अभंग गायनावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भागवत धर्माचा आणि विचारांचा प्रसार करत आहे. ते रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले होते. त्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे.

अमोल मिटकरी यांनी एक फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचा फोटो आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी काम करतात का? असा सवाल त्यांनी अप्रत्यक्षपणे उपस्थित केला आहे. अहो दाजी, हेच का ते रंजले गांजले? असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. पण या कार्यक्रमादरम्यान त्यांना भाषणाची संधी दिली गेली नव्हती. त्यामुळे एक वाद निर्माण झाला होता. त्यावरुनही अमोल मिटकरी यांनी भाजपला सुनावले होते.

महत्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा; म्हणाली, माझ्या मुलीने डेटींग ऍपवर माझं अकाऊंट उघडलं अन्…
बेरोजगारांसाठी खुशखबर! राज्य सरकार ‘या’ विभागात करणार एक लाख पदांची मेगाभरती, वाचा डिटेल्स
एका चुटकीत ३०० कोटी कमवू शकतो, तेव्हा त्यांना वाटायचे बाता मारतोय, पण आता ते खरं झालय