Share

‘तू माझ्या जवळ येऊ नको..’; मर्यादा ओलांडणाऱ्या सलमानला अभिनेत्रीने चांगलंच खडसावलं

अभिनेता सलमान खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. अभिनेता म्हणून सलमाननं गेल्या कित्येक दशकांमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. त्याचं आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींशी देखील नाव जोडलं गेलं.

त्याचे नाव ज्या अभिनेत्रींशी जोडलं गेलं त्यात अभिनेत्री भाग्यश्रीचं देखील नाव येतं. मात्र या अभिनेत्रीने सलमान खानला धमकी दिली होती. त्यामुळे ते प्रकरण सोशल मीडियावर चांगलंच गाजलं होतं. सध्या सलमानला येणाऱ्या धमक्या पाहता त्याचे हे जुने प्रकरण पुन्हा पुढे आले आहे.

नेमकं काय होतं ते प्रकरण जाणून घेऊ. अभिनेत्री भाग्यश्रीने सलमान सोबत ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून स्क्रिन शेअर केली होती. पण तिने त्याच्यासोबत दुसरा चित्रपट करण्यास नकार दिला होता. पहिल्याच चित्रपटाच्या सेटवर भाग्यश्रीने सलमानला दरडावलं देखील होतं.

माहितीनुसार, दिल दिवाना’ या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान सलमान हे गाणं भाग्यश्रीच्या कानात गुणगुणत तिला सतावत होता. त्यावेळी भाग्यश्रीला सलमानचं हे वागणं आवडत नव्हतं. तिने तू माझ्या अजिबात जवळ येऊ नको असे म्हणत सलमानला दरडावलं देखील होतं. त्यावेळी त्याचे हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं.

मध्यंतरी ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान सलमान खान सूत्रसंचालन करत होता. यावेळी त्याने सांगितले की, ‘मैने प्यार किया’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भाग्यश्रीने पुढे काम करण्यास नकार दिला होता, कारण, तिला लग्न करायचं होतं. त्यानंतर सहा महिने मला कोणतही काम मिळत नव्हतं. हे सगळ्या गोष्टी सांगत असताना त्याचे डोळे पाणावले होते.

दरम्यान, सिद्धू मुसेवाला नंतर सलमान खानला देखील धमकी आली होती. त्याला मारण्यासाठी योजना आखण्यात आली होती. एवढेच नाही तर, सलमान खान बाहेर असताना त्याच्या घराजवळ आणि बाहेर एक शार्प शूटर पोहोचला होता. पोलिस व्हॅन आली तेव्हा शार्पशूटर सलमान खानवर गोळी झाडणार होता आणि शूटर पळून गेले होते.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now