भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची T२०I मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या १-२ ने पिछाडीवर आहे. मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन केले. दरम्यान, माजी कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाच्या एका फलंदाजावर जोरदार टीका केली आहे. या खेळाडूच्या सततच्या खराब कामगिरीने कपिल नाराज झाले आहे.(Kapil Dev, Rishabh Pant, Sanju Samson, Tika)
टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सातत्याने फ्लॉप होत आहे. अशा स्थितीत पंतऐवजी संजू सॅमसनला संघात संधी देण्याची चर्चा कायम आहे. पण कपिल देव यांचे सॅमसनबद्दलचे मत जगापेक्षा वेगळे आहे. कपिलने उघडपणे सॅमसनवर टीका केली आहे.
जेव्हा कपिल देव यांना ऋषभ पंत, इशान किशन, रिद्धीमान साहा आणि संजू सॅमसन यापैकी सर्वोत्तम यष्टिरक्षक कोण असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, जर तुम्ही कार्तिक-इशान आणि संजूबद्दल बोलले तर ते सर्व समान स्तराचे आहेत. तिघांची फलंदाजी करण्याची पद्धत वेगळी आहे, पण जर कोणता यष्टिरक्षक सर्वोत्तम फलंदाज म्हटला तर तो म्हणजे रिद्धीमान साहा.
दरम्यान, कपिल देवही संजू सॅमसनवर जोरदार टीका करताना दिसले. कपिल म्हणाले फलंदाजीच्या दृष्टिकोनातून सगळे समान आहेत. जेव्हा त्यांचा दिवस असतो तेव्हा कोणीही चमत्कार करू शकतो. पण संजू सॅमसनमुळे मी खूप निराश झालो आहे. त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे पण तो एक-दोन सामन्यात अप्रतिम दाखवतो आणि नंतर अपयशी ठरतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसनलाही संधी मिळाली नाही. मात्र, आयपीएल २०२२ मध्ये सॅमसनची कामगिरी चांगली होती. याशिवाय कर्णधारपदाखाली तो चांगलाच गाजला. सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. मात्र या संघाला अंतिम फेरीत गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
महत्वाच्या बातम्या-
उमरानची टिम इंडियात निवड झाल्यामुळे मी खुश आहे पण.., कपिल देव यांचे विचित्र वक्तव्य
जेव्हा धावांची गरज असते तेव्हा.., कपिल देव रोहित, विराट, राहुल या स्टार फलंदाजांवर भडकले
राजकारणात येण्यासाठी तयार आहात का? कपिल देवचे उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक
मोठ्या कष्टाने एकट्या आईने ६ मुलांना वाढवले आणि देशाला मिळाला कपिल देव सारखा महान खेळाडू