सुशांत सिंग राजपूतच्या आठवनीत वेडी झाली सारा अली खान; म्हणाली, ‘मला ‘ते’ सर्व क्षण दिल्याबद्दल…

14 जून 2022 रोजी प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत(Sushant Singh Rajput) याच्या निधनाला पूर्ण दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही त्याचे चाहते आणि को-स्टार्स त्याला विसरू शकलेले नाहीत. ती वेदना आणि तो ताण आजही तसाच आहे, जसा तेव्हा होता.(sara-ali-khan-went-crazy-in-the-memory-of-sushant-singh-rajput-its-all-about-giving-me-that-moment)

सुशांत सिंग राजपूतच्या डेथ ॲनिव्हर्सरीला(Death Anniversary)  को-स्टार्स सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांनी पोस्ट शेअर केली आहे. सारा अली खानने एक लांबलचक पोस्ट शेअर करून सुशांतची आठवण काढली तेव्हा कार्तिकने असे काही लिहिले की तो भारावून गेला.

सुशांत सिंग राजपूतला त्याचे मित्र, प्रियजन आणि स्टार्स कसे आठवत आहेत ते जाणुन घेवूया. सारा अली खानने केदारनाथ(Kedarnath) चित्रपटातील सुशांत सिंग राजपूतसोबतचा एक न पाहिलेला फोटो शेअर केला आहे.

त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “जेव्हा मी पहिल्यांदा कॅमेऱ्या फेस केला, तेव्हा मी पहिल्यांदाच तुझ्या टेलिस्कोपने चंद्रापासून जुपिटरपर्यंत सर्व काही पाहिले. फक्त तुझ्यामुळे. धन्यवाद सुशांत तू मला खूप आठवणी आणि क्षण दिलेस.”

सारा अली खान(Sara Ali Khan) पुढे लिहिते, आज जेव्हा मी आकाशात चंद्र पाहते तेव्हा मला समजते की तो तूच आहेस. तू तिथेच तुझ्या आवडत्या स्टार्सच्या जवळ आहेस. तू नेहमीचं चमकत होतास आणि असाच शाइन करत राहशील. सारा अली खानने सुशांत सिंग राजपूतच्या केदारनाथमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

तसेच कार्तिक आर्यनने(Kartik Aryan) सुशांत सिंग राजपूतचा फोटोही ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, स्टार्स कुठेही असले तरीही ते नेहमीच शाइन करतात.