यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. ‘देवेंद्र भुयाळ, संजय मामा शिंदे यांनी आम्हाला मतं दिलेली नाहीत,’ अशी माहिती राऊत यांनी दिली. तसेच राज्यसभा निवडणुकीत शब्द देऊनही शब्द न पाळणाऱ्यांची नोंद राज्य सरकारने केलीय,’ असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
तर दुसरीकडे संजय राऊत यांनी केलेले आरोप अपक्ष आमदारांच्या जिव्हारी लागले आहेत. संजय राऊत यांनी केलेले आरोप देवेंद्र भुयार यांनी आरोप फेटाळले आहेत. याच प्रकरणावरून ते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला सुद्धा निघाले आहेत.
यापूर्वी माध्यमांशी बोलताना देवेंद्र भुयार यांनी मोठे विधान केले आहे. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत निवडून आलो आहे. तेव्हापासून मी आघाडीसोबत आहे. संजय राऊत यांचा पक्ष आत्ता आघाडीसोबत आला. गद्दारी करायची असती तर यापूर्वीच केली असती पण मतदान करुनही असे बोलत असतील तर संजय राऊत यांचं कुठेतरी चुकत असल्याच भुयार यांनी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचं नियोजन चुकलेलं आहे. मला एक सुद्धा फोन शिवसेनेकडून आला नाही तरी मी त्यांना मतदान केलं आहे. आम्ही शरद पवारांची भेट घेणार आहोत,’ असं भुयार यांनी म्हंटलं आहे. यामुळे अपक्ष आमदार एकत्र येऊन मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याच बोललं जातं आहे.
याचबरोबर ‘पहिल्या पसंतीचं मतदान संजय पवार, दुसऱ्या पसंतीचं मतदान संजय राऊत यांना केलं आहे, असं भुयार यांनी यावेळी बोलताना जाहीर केलं आहे. यावर आमदार संजयमामा शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे मतदान केलं. आघाडी सरकार स्थापन होता मला विमानाने नेलं. अनिल देसाई आणि अरविंद सावंत या दोघांबरोबर जाऊन मी मतदान केलं. त्यांनी जो कागद दिला त्यापद्धतीने मतदान केलं,’ असं संजयमामा शिंदे म्हणाले.