Share

पवारांनी मुख्यमंत्र्यांचा केला ‘टप्प्यात कार्यक्रम’, परस्पर मतांचा कोटा बदलला; ठाकरे संतापले

sharad pawar udhav thackeray
आजचा दिवस राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठीची अत्यंत अटीतटीची निवडणूक आज  पार पडत आहे. याचबरोबर महाविकास आघाडी अन् भाजपनेही ‘विजय आमचाच’ असा दावा केला आहे. यामुळे निवडणुकीतील चुरस आता आणखीच वाढली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सर्वच राजकीय पक्ष आपली रणनिती आखण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं. तिन्ही पक्षांनी गुरुवारी सायंकाळी पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते कोणाला द्यायची याचे प्रशिक्षण आमदारांना देण्यात आले. ‘एमआयएम’ची दोन मते शिवसेनेसाठी अडचणीची ठरणारी आहेत. स

हाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. अशातच निवडणुकीच्या दिवशीच एक मोठी घडामोड घडल्याची माहिती हाती येत आहे. ऐन क्षणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मतांचा कोटा बदलला असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 42 मतांचा कोटा शरद पवारांनी 44 केल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केल्याची देखील माहिती समोर येतं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी मतांचा कोटा बदलल्यानं अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंतांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून मतांचा कोटा बदल्यात आला आहे. प्रत्येक उमेदावाराला 42 मतं राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी लागणार आहेत. मात्र 42 मतांचा कोटा ठरलेला असताना, तो 44 का केला गेला, यावरुन सध्या चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे या सर्व घडामोडीवर अद्याप शिवसेनेची प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र आता शिवसेनेच्या भूमिकेकडे राज्याचे याचबरोबर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून, विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत प्रत्येक मतासाठी चुरस असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now