सलमान खानला मिळालेल्या धमकीची झाली उकल; पोलिसांच्या हाती लागला धमकी देणारा आरोपी

गायक सिद्धू मिसेवाला याची नुकतीच गोळ्याझाडून हत्या करण्यात आली. तेव्हापासून पोलीसांची चौकशी सुरू असून, यासंदर्भात रोज काहीना काही धागेदोरे मिळत आहेत. त्यातच आता बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला देखील धमकीचं पत्र आलं होतं. त्याचीही चौकशी सुरू होती. आता हे प्रकरण सोडवण्यात पोलिसांना यश आलं आहे.

सलमान खानच्या घराबाहेर धमकीचं पत्र मिळालं होतं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये तसेच सलमानच्या चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली. या प्रकरणाची चौकशी पोलीस करू लागले. आता पोलिसांच्या चौकशीत या पत्राचे संपूर्ण सत्य समोर आले आहे, आणि हे प्रकरण मिटलं आहे.

माहितीनुसार, धमकीचे पत्र मिळाल्याप्रकरणी सौरभ महाकाल नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे येत असून, त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी मोठी कारवाई करत पुणे ग्रामीण पोलिसांनी फरार सौरभ महाकाल याला मोक्का अंतर्गत अटक केली आहे. या आरोपीचे तार सिद्धू मुसावाला यांच्या हत्येशी संबंधित आहेत.

सौरभ महाकाल व्यक्तीच्या मागावर पोलीस होते. आता त्याची चौकशी सुरू आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येत त्याचा काही हात होता की नाही हे सध्या तरी कळू शकलेले नाही. पण त्याच्या माध्यमातून आता अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

सलमान खानला धमकीचं पत्र मिळाले या प्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा बुधवारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी दिल्लीत आली आहे. दुसरीकडे,मुंबई पोलिसांनी सलीम खान आणि सलमान खानचे जबाब नोंदवले असून सलमान खानच्या वांद्रे येथील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गायक सिद्धू मुसेवाला याची २९ मे रोजी अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर देशभरात खळबळ निर्माण झाली. गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा या राज्यातील पोलीस प्रशासनाची सूत्रे हलली. त्यात सलमान खानला देखील धमकीचं पत्र आल्याने महाराष्ट्रात भीतीचे वातावरण झालं होतं.