MX Player वरच्या ‘या’ वेब सिरीज एकट्यानेच पाहा, आश्रम ३ पेक्षा बोल्ड सीन्सचा आहे तडका

MX Player च्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीज ‘आश्रम’ च्या तिसऱ्या सीझनने पुन्हा एकदा सिद्ध केले की जर एखाद्या स्क्रिप्टमध्ये गुन्हेगारी आणि सस्पेन्स मिसळले तर ती चमत्कार घडवू शकते. पहिल्या दोन सीझनपासून सगळ्यांना भुरळ घालणाऱ्या ‘आश्रम’च्या या सीझनमध्ये बॉबी देओलच्या दमदार अभिनयासह अभिनेत्री ईशा गुप्ताच्या एंट्रीने पटकथेत भर पडली आहे. विशेष म्हणजे ईशा बोल्ड कॅरेक्टर्स साकारण्यासाठी ओळखली जाते आणि यातही ती असेच काहीसे करताना दिसली आहे.(Webseries, ashram, bold characters, intimate scenes)

बॉबी आणि तिच्या इंटिमेट सीन्सची बरीच चर्चा आहे. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की MX Player वरील ‘आश्रम ३’ मध्येच बोल्डनेसची मर्यादा ओलांडली गेली आहे, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. आज आम्‍ही तुम्‍हाला MX Player वरील निवडक वेब सिरीजबद्दल सांगणार आहोत, ज्या त्‍यांच्‍या बोल्‍ड सीनमुळे खूप चर्चेत आले आहेत आणि लोकांना त्‍यांना पुन्हा-पुन्हा पाहण्‍यास आवडते.

Hello Mini 2

‘हॅलो मिनी’
‘आश्रम’च्या तीन सीझनशिवाय एमएक्स प्लेयरची आणखी एक लोकप्रिय वेब सीरिज आहे, जी बोल्ड सीन्सने भरलेली आहे. आम्ही बोलत आहोत ‘हॅलो मिनी’ या सीरिजबद्दल. यातील सायकोलॉजिकल थ्रिलर प्रेक्षकांना खूप आवडला होता. पण जर तुम्हाला ते पहायचे असेल तर कुटुंबासोबत पाहू नका.

कैंपस डायरीज

‘कॅम्पस डायरी’
‘कॅम्पस डायरीज’ ही वेबसिरीज कॉलेजच्या दिवसांची आठवण करून देणारी आहे. प्रसिद्ध यूट्यूबर हर्ष बेनिवाल स्टारर या वेब सीरिजमध्ये हास्यासोबतच बोल्डनेसचा तडकाही जोडण्यात आला आहे. तरुणाईला आकर्षित करणारी ही वेब सिरीज सहा कॉलेज मित्रांची कहाणी सर्वांसमोर मांडते.

रूहानियत

‘रूहानियत’
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीने वेब सीरिजमध्येही हात आजमावला आहे. युविका चौधरी, अमन वर्मा, कनिका मान आणि अर्जुन यांनी ‘रुहनियत’मध्ये जबरदस्त अभिनय केला आहे. या सीरीजमध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे प्रेक्षकांना घाम फुटवतील. सीरीजमध्ये अनेक इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले आहेत.

रक्तांचल

‘रक्तांचल’
एमएक्स प्लेयरच्या ‘भौकाल’ प्रमाणेच त्याची दुसरी वेब सीरिज ‘रक्तांचल’ देखील अॅक्शन, थ्रिलर आणि रोमान्सने परिपूर्ण आहे. ही वेब सिरीज ८० च्या दशकातील पूर्वांचल वर आधारित आहे. ही सीरिज खऱ्या घटनांनी प्रेरित असल्याचे सांगितले जाते. जबरदस्त कथेसोबतच जर बोल्ड सीन्सबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या बाबतीतही ही सीरिज तुम्हाला अजिबात निराश करणार नाही.

मस्तराम का एक सीन

‘मस्तराम’
‘मस्तराम’ ही सुद्धा खूप लोकप्रिय वेब सीरीज आहे, जी कदाचित सर्वांनी पाहिली असेल. ही कथा आहे एका लेखकाची ज्याने अशा पात्रांना आपल्या कथांमध्ये विणले आहे, ज्याच्या हॉटनेसचे जग वेडे आहे. ‘मस्तराम’च्या प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला खूप बोल्ड सीन्स पाहायला मिळतील. त्यामुळे ही सीरीज एकटेच पहा.

महत्वाच्या बातम्या-
‘या’ चार बोल्ड वेबसिरीजने घातलाय धुमाकूळ, चुकूनही घरच्यांसोबत पाहू नका, नाहीतर होईल फजिती
वेबसिरीजमधील बोल्ड सीनबाबत काय म्हणाली प्राजक्ता माळी? वाचून तुम्हाला धक्का बसेल
एकेकाळी वेबसिरीजमधील बोल्ड भूमिकांवर टिका करणारी प्राजक्ता माळी आता मात्र स्वताच…
एकता कपूरच्या या वेबसिरीजने तोडल्या अश्लीलतेच्या सगळ्या सीमा, सीन्स पाहून तुम्हालाही फुटेल घाम