Share

ह्युंदाई, टाटाला मागे टाकत मारुती सुझुकीची ‘ही’ गाडी बनली नंबर वन, वाचा किंमत अन् फीचर्स

मारुती सुझुकीची डिझायर सेडान(Desire Sedan) ही मे 2022 महिन्यासाठी त्याच्या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. डिझायरने गेल्या महिन्यात एकूण 11,603 कारची विक्री नोंदवली आहे.(hyundai-surpasses-tata-to-become-maruti-suzukis-this-car)

2021 मध्ये याच महिन्यात 5,819 वाहनांच्या विक्रीच्या तुलनेत ही 99 टक्के वाढ झाली आहे. टाटा टिगोर(TATA Tigore) दुसऱ्या नंबरवर राहिली आहे. मे 2022 मध्ये 3,975 युनिट्सची विक्री झाली, जी 2021 मध्ये याच महिन्यात 367 युनिट्सच्या तुलनेत 983 टक्क्यांनी वाढली आहे.

Honda Amaze मे 2021 मध्ये 478 वाहनांच्या तुलनेत 3,709 वाहनांच्या विक्रीसह तिसर्‍या क्रमांकावर राहिली आणि वर्षभरात 676 टक्के वाढ नोंदवली.

मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या सेडान डिझायरच्या किंमती 6.24 लाख रुपये एक्स-शोरूमपासून सुरू होतात आणि 9.17 लाख रुपयांपर्यंत जातात. मारुती डिझायरमध्ये(Maruti Desire) 1.2-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे, जे 90PS पर्यंत पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करू शकते.

मारुती डिझायरचे मायलेज मॅन्युअल ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये 23.26kmpl आणि 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये 24.12 kmpl पर्यंत आहे. मारुती डिझायर केवळ दिसायलाच उत्तम नाही तर त्याची वैशिष्ट्येही जबरदस्त आहेत.

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now