आपल्याकडे असे काही आजार आहेत त्याने व्यक्तीचा मृत्यू हा अटळ असतो, असे बोलले जाते. त्यातीलच एक आजार म्हणजे कॅन्सर आतापर्यंत अनेकांचा या आजाराशी लढताना जीव गेला आहे. अलीकडे कॅन्सर होण्याचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या भीतीच्या वातावरणात एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. कॅन्सरवर रामबाण उपाय सापडला आहे. तुम्ही कॅन्सरने ग्रस्त असाल तर आता काळजी करू नका. कॅन्सर उपचारात शास्त्रज्ञांना ऐतिहासिक यश मिळालं आहे. यामुळे आता काही दिवसात कॅन्सरपासून रुग्णाची सुटका होणार आहे. तर जाणून घेऊया सविस्तर..
वाचून तुम्हालाही नक्कीच अभिमान वाटेल. शास्त्रज्ञांनी कॅन्सरविरोधात असं औषध तयार केले आहे, ज्यामुळे कॅन्सर काही दिवसातच गायब होतो. मिळालेल्या माहितीनुसार, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीने तयार केले हे औषध आहे.
विशेष बाब म्हणजे या औषधाची रुग्णांवरील चाचणी 100 % यशस्वी ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच कॅन्सर रुग्णांवर डोस्टारलिमॅब औषधाचं ट्रायल घेण्यात आलं. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 12 रुग्णांना ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीने तयार केले हे औषध देण्यात आलं.
याचबरोबर एका मर्यादित कालावधीपर्यंत हे औषध दिल्यानंतर या रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या शरीरात कॅन्सर नसल्याचं निदान झालं. या औषधामुळे आता कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कॅन्सरच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
दरम्यान, याबद्दलची माहिती देताना संशोधनाच्या सहलेखिका डॉ. एंड्रिया सेर्सेक यांनी म्हंटलं आहे की, या संशोधनानंतर आनंदी झालेल्या रुग्णांचे अनेक ई-मेल आले. ते वाचून मला अश्रू आल्याच त्यांनी मध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तसेच या औषधामुळे आता अनेकांचे प्राण वाचणार आहे.