टीम इंडिया ९ जून रोजी खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये परत येईल, जेव्हा टीम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. यावेळी संघ नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या स्टार खेळाडूंशिवाय असेल. आयपीएलच्या दोन महिन्यांनंतर त्यांना ब्रेक देण्यात आला आहे. संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे असेल तर ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
आयपीएल २०२२ हा रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसाठीही खराब सीजन होता. या सत्रात मुंबई इंडियन्सचा कर्णधार एकही अर्धशतक झळकावू शकला नाही, तर कोहलीनेही या आवृत्तीत २२.७३ च्या खराब सरासरीने धावा केल्या. तसेच केएल राहुल या सीजनमधील सर्वाधिक धावा करणारा दुसरा (१५ डावांत ६१६ धावा) खेळाडू ठरला. यानंतरही आरसीबीविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यातील त्याच्या खेळीवर टीका झाली होती.
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आता रोहित, कोहली आणि राहुल यांच्या कामगिरीबद्दल मत व्यक्त केलं आहे, जे सध्या भारताचे T20I मध्ये पहिल्या तीन पसंतीच्या फलंदाजांपैकी आहेत. कपिल देव यांनी सांगितले की, त्यांची मोठी प्रतिष्ठा आहे आणि त्यांच्यावर खूप दबाव आहे, जो की नसायला पाहिजे. तुम्हाला निर्भय होऊन क्रिकेट खेळावे लागेल. हे सर्व खेळाडू आहेत जे १५०-१६० च्या स्ट्राइक रेटने खेळू शकतात. मात्र जेव्हा संघाला धावांची गरज असते तेव्हा ते सर्व बाद होतात.
कपिलने सांगितले की, जेव्हा खरा खेळ सुरु होण्याची वेळ येते तेव्हा ते आऊट होतात आणि त्यामुळे दबाव वाढतो. ते पुढे म्हणाले की, एकतर ते अँकरची भूमिका बजावतात किंवा स्ट्रायकरची भूमिका बजावतात. केएल राहुलबद्दल बोलताना, माजी विश्वचषक विजेता भारताचा कर्णधार म्हणाला की त्याच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले पाहिजे. आघाडीच्या तीन फलंदाजांची अशी सातत्यपूर्ण कामगिरी बीसीसीआयला बदल करण्यास भाग पाडू शकते.
कपिल म्हणाला की, जर केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर, संघाने तुम्हाला पूर्ण २० षटके खेळायला सांगितले आणि तुम्ही ६० धावा करून परत येता. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या संघाला न्याय देत नाही. माझ्या मते दृष्टिकोन बदलायला हवा आणि जर तसे झाले नाही तर तुम्हाला खेळाडू बदलावे लागतील. एक मोठा खेळाडू मोठा प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे. मोठी प्रतिष्ठा असणे पुरेसे नाही, तर तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल.
महत्वाच्या बातम्या-
राजकारणात येण्यासाठी तयार आहात का? कपिल देवचे उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक
मोठ्या कष्टाने एकट्या आईने ६ मुलांना वाढवले आणि देशाला मिळाला कपिल देव सारखा महान खेळाडू
जडेजाने मोडला कपिल देव यांचा हा विक्रम, ICC च्या ऑल राऊंडरच्या पंगतीत मिळवले पहिले स्थान
कपिल देवचा ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम रविंद्र जडेजाने काढला मोडून; ‘हा’ विक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज






