यावेळी बोलाताना गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) पद आपल्याला मिळावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मात्र तुळजापूरच्या तुळजाभवानीचे पाय धरले आहेत.
त्यानंतर राज्यात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असे विधान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. त्यानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया समोर आली. ‘उद्धव ठाकरे यांनी देशाचा पंतप्रधान व्हावं अशी इच्छा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली होती.
तसेच काल आपल्या वाढदिवशी कार्यकर्त्यांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी ‘जर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान (Prime Minister) झाले तर आपण मुख्यमंत्री होऊ शकतो, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. यामुळे आता आणखीच राजकीय वातावरण तापणार असल्याच बोललं जातं आहे.
ते जळगाव येथे बोलत होते. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदानंतर गुलाबराव पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल, असं म्हटलं. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचवल्या. ते म्हणाले, उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मला मुख्यमंत्री होता येईल.’
दरम्यान, ‘जनतेच्या आशिर्वाद प्रेमामुळे मी मंत्री झालो, मात्र मी राजकारणात आलो नसतो तर किर्तनकार झालो असतो. तसेच किर्तनकार झालो असतो तर अर्ध्या कीर्तनकारांची दुकानं बंद करून टाकली असती, असही त्यांनी यावेळी बोलताना म्हंटले आहे. सध्या राजकीय वर्तुळात गुलाबराव पाटील यांच्या व्यक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.