अमेरिकेतल्या एका आई आणि मुलाची भेट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तब्बल २० वर्षानंतर एका आईने तिच्या मुलाचा शोध घेतला. तोही सोशल मिडियाच्या मदतीने. आई आणि मुलाच्या भेटीची ही करूण कहाणी त्या मुलाने फेसबुक पोस्टमध्ये शेअर केली आहे. अतिशय भावनिक होऊन त्याने सर्व झाला प्रसंग सांगितला आहे की, आपल्या आईची आणि आपली भेट कशी झाली? दोघांनी एकाच ठिकाणी काम केलं आहे, हे त्याला भेटीनंतर समजलं. (My-Lake had been searching for each other for 20 years )
युटाह राज्यातील बेंजामिन हुलेबर्ग या तरुणाची त्याच्या आईशी भेट झाली. एका फेसबुक मेसेजमुळे २ दशकानंतर ते एकत्र आले. साल्ट लेक एचसीए हेल्थकेअरच्या सेंट मार्क हॉस्पिटलमध्ये या दोघांनीही एकत्र काम केले आहे. हे एकमेकांना भेटल्यावर लक्षात आले, असे त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
होली शिअर्स असे त्या मुलाच्या आईचे नाव आहे. होली शिअर्स या १५ वर्षाच्या असताना त्यांनी एका बाळाला म्हणजे बेंजामिनला जन्म दिला होता. पोटात ६ महिन्याचे मुल असतानाच त्यांनी त्या मुलाला त्याच्या जन्मानंतर दत्तक देण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मुलाला आपण चांगले आयुष्य देऊ शकणार नाही, अशी त्यावेळी त्यांची भावना होती.
होली शिअर्स यांनी एंजला आणि ब्रायन हुलेबर्ग या दाम्पत्त्याला ते मुल दत्तक दिले. त्याच्या जन्माच्या दिवशीच २००१ मध्ये तो हुलेबर्ग कुटुंबाचा भाग झाला. हुलेबर्ग या दाम्पत्त्याने त्या मुलाला तो दत्तक असल्याची कल्पना लहानपणीच दिली होती. त्या कुटुंबाने त्याचा सांभाळ केला. आज बेंजामिन हुलेबर्ग एका शाळेत शिक्षक आहे.
बेंजामिन हुलेबर्ग आपल्या जन्मदात्या आईच्या शोधात अनेक वर्षांपासून होता. त्याने त्याविषयी त्याच्या आई वडिलांना पण विचारले होते. आपल्या आईला शोधण्यासाठी त्याने DNA टेस्टही केली होती. २०२१ नोव्हेंबर मध्ये त्याला आलेल्या एका फेसबुक मेसेजमुळे त्याला त्याच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळाली, असे बेंजामिनने सांगितले आहे. पुढे तो असं पण लिहितो की, तो मेसेज मी बघितला तेव्हा मशीन नं१५ वर मी काम करत होतो. मला अजूनही आठवतंय. तो दिवस मी विसरूच शकत नाही.
बेंजामिनची आई पण त्याला विसरू शकली नव्हती. ज्या एजन्सीच्या माध्यमातून तिने बेंजामिनला दत्तक दिले होते त्यांच्याकडे ती कायम त्याची विचारपुस करत असे. २०१४ मध्ये ती एजन्सी बंद झाली मग तिने सोशल मिडियावर शोध सुरु केला. कायम सुट्टीच्या दिवसांत, बेंजामिनच्या वाढदिवसाला त्या भावनिक होत असे. २०१८ मध्ये शेवटी मला त्याचे सोशल मिडिया हँडल सापडले. तो १८ वर्षाचा होता, मला बोलायचा धीर होत नव्हता आणि त्याच्याही आयुष्यात बरेच काही सुरु होते. मला त्याच्या जीवनात ढवळाढवळ करायची नव्हती, असे बेंजामिनची आई म्हणाली.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ पक्षाचा राज्यसभेसाठी मविआला पाठींबा जाहीर; शिवसेनेला दिलासा तर भाजपला झटका
केतकी चितळेच्या वकीलांनी राज्य सरकारवर केले गंभीर आरोप; राज्यपालांची भेट घेत केली ‘ही’ मोठी मागणी
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही काळी जादू, मांत्रिकांच्या नादात पुण्यातील ७ मोठे व्यवसायिक झाले उद्ध्वस्त