१. पोलिसांना मिळाला मोठा सुगावा; हरियाणाच्या ‘या’ शहराशी संबंधित आहे सिद्धू मुसेवालाच्या हत्येची लिंक
२. हरियाणाच्या ‘या’ शहराशी संबंधित आहे सिद्धू मुसेवालाच्या हत्येची लिंक; सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे उघडत आहे रहस्य
सिद्धू मुसेवालाच्या हत्येचे तार हरियाणातील फतेहाबाद येथून जोडलेले दिसत आहेत. पंजाब पोलिसांनी फतेहाबाद येथून हत्येसाठी वापरलेल्या वाहनाची माहिती गोळा केली आहे. पंजाब पोलिसांनी फतेहाबादमधील रतिया रोड आणि हंसपूर रोड येथील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले आहेत.
यामध्ये हत्येसाठी वापरलेली बोलेरो गाडी फतेहाबादहून हंसपूर रोडकडे जाताना दिसली आहे. सीसीटीव्ही फुटेज २५ मेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांना फतेहाबादमध्ये माहिती मिळाली होती. पंजाब पोलिस गेल्या तीन-चार दिवसांपासून येथे शोध मोहीम राबवत असून सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असल्याचे सांगण्यात येत आहे.
शोध मोहिमेदरम्यान खुनात वापरलेल्या वाहनाचे सीसीटीव्ही फुटेज पंजाबला जात असल्याचे आढळून आले. तर एका तरुणाला भिरडाणा येथून अटक करण्यात आली असून दुसऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही कारशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.
पंजाब पोलिसांनी फतेहाबादच्या सीआयए पथकासह गुरुवारी रात्री उशिरा भिरडाणा गावातून एका तरुणाला अटक केली आणि दुसऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या तरुणाची ओळख पवन कुमार अशी आहे. ही कारवाई सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाशी जोडली जात आहे.
दोघेही हत्येसाठी वापरण्यात आलेल्या बोलेरो गाडीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, फतेहाबादच्या पोलीस अधीक्षकांनी हे अमान्य केलं आहे. पोलिस अधीक्षक सुरेंद्र सिंह भोरिया म्हणतात की एप्रिल महिन्यातील काही प्रकरणात पंजाब पोलिस अटक वॉरंट घेऊन आले होते आणि एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि दुसऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याचवेळी, दोघांचाही सिद्धू मूसवाला खून प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. वाहनाबाबत काही मुद्दा असल्यास पोलीसांना सहकार्य करण्यास तयार आहे आणि जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं दिली जातील, असे दोघांच्या कुटुंबीयांनी सांगितले. पोलीस पुढचा तपास करत आहेत.