भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील क्रिकेट मालिका खेळण्याबाबत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू विचार करत असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००४-०५ साली क्रिकेट मालिका खेळवली गेली होती. त्यावेळी पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला होता.
२००४-०५ साली भारत दौऱ्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ६ एकदिवसीय आणि ३ कसोटी सामने खेळवले गेले होते. एकदिवसीय मालिका पाकिस्तान संघाने ४-२ अशा फरकाने जिंकली होती. तर, कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली होती.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २००५ नंतर कोणतीही मालिका खेळवली गेली नाही. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ खेळताना पहायला मिळतात. १०-१२ वर्षापासून क्रिकेट मालिका या दोन देशांमध्ये खेळली गेली नाही.
भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्याशिवाय दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका खेळवली जाणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील राजकीय संबंध देखील तणावपूर्ण आहेत. पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिजवानने दावा केला आहे की, पाकिस्तान खेळाडू प्रमाणे भारतीय खेळाडू देखील भारत- पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळण्यास तयार आहेत.
पाकिस्तानी खेळाडूंप्रमाणे टीम इंडियातील क्रिकेटर्सनादेखील भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवली जावी असं वाटतं. दोन्हीं संघांच्या खेळाडूंना एकमेकांविरोधात क्रिकेट खेळावंसं वाटत. पण दोन्हीं देशांमधील राजकीय तणाव पाहता हे खेळाडूंच्या नियंत्रणात नाही, असा दावा पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिजवानने केला आहे.
कोविडच्या काळामध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका खेळवण्यात यावी. भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेतील निधी कोरोना बाधितांसाठी वापर केला जावा. याबाबत असा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेटपटूंनी मांडला होता. भारतीय क्रिकेट मंडळाने त्या प्रस्तावाला स्पष्टपणे निकार दिला होता.
महत्वाच्या बातम्याः-
२४% व्याजाने पैसे देणाऱ्या LIC किंगच्या घरावर छापा, कोट्यावधींच्या घबाडासह १०० तोळे सोने जप्त
पुण्याच्या उद्योगक्षेत्राला मोठा धक्का! प्रसिद्ध ‘प्रवीण मसाले’चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे निधन
तिन्ही बाजूंनी केली फायरिंग, मग मृत्यु झाल्याचं केलं कन्फर्म, मुसेवालाच्या मित्रांनी सांगितला थरारक घटनाक्रम