क्रिकेटपटू दीपक चहर अडकला लग्नबेडीत, लुक पाहून चाहते घायाळ; पहा लग्नातील सुंदर फोटो

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर बुधवारी रात्री विवाहबंधनात अडकला. त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत त्याने आग्रा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये सात फेऱ्या मारल्या. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाले आहेत.

मंगळवारी खास मित्र आणि जवळच्या नातेवाईकांमध्ये त्यांची मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. बुधवारी सकाळी मोठ्या थाटात हळदी वाजवण्यात आली आणि सायंकाळी बँड-बाजाच्या गजरात मिरवणूक निघाली. त्यांच्या लग्नातील फोटोला चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळत आहे.

दीपक चहर याच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास, क्रीम रंगाची शेरवानी आणि राजस्थानी साफा त्याने परिधान केलेला होता. दीपकचा लुक पाहून चाहते घायाळ झाले. यावेळी तो घोड्यावर बसलेला असताना राजपुत्रापेक्षा कमी दिसत नव्हता. पीच कलरच्या लेहेंगा-चुनरीमध्ये जयाही खूप सुंदर दिसत होती.

स्टेजवर पोहोचल्यानंतर काही वेळातच लग्नाचे विधी पूर्ण झाले. यानंतर दोघांनी सात फेरे घेतले. दीपक आणि जया यांच्या लग्नात केंद्रीय राज्यमंत्र्यांसह काही ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू, अनेक विद्यमान माजी खासदारही उपस्थित होते. धोनी सामील होणार असल्याची चर्चा देखील होती मात्र तो या लग्नात उपस्थित नव्हता.

या दोघांचे नाते त्यावेळेस चर्चेत आले होते जेव्हा दीपकने आयपीएल २०२१ च्या एका लाईव्ह सामन्यादरम्यान जयाला स्टँड्समध्ये प्रपोज केले होते. दोघांनी स्टेडियममध्ये एकमेकांना अंगठी घातली होती. दीपकची बहीण मालती चाहरने जयाशी दीपकची ओळख करून दिली होती.

जया भारद्वाज ही सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. सिद्धार्थ हा व्हीजे असून तो मॉडेलिंगही करतो. सिद्धार्थ हे टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. सिद्धार्थ भारद्वाज बिग बॉस, फियर फॅक्टर आणि खतरों के खिलाडी सारख्या टीव्ही शोमध्ये झळकला आहे. त्याचे प्रचंड चाहते आहेत.