पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राष्ट्रीय कार्यक्रम गरीब कल्याण संमेलनात विविध निवडक योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. (cm shivraj singh chauhan on narendra modi)
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि सरदार पटेल यांचा त्रिवेणी असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदी हे आपल्या देशासाठी देवाचं एक वरदान आहे, असेही मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले आहे.
महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेबद्दल शिवराज सिंग चौहान यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले की, बघा, एका महान माणसाची दुसऱ्या महामानवाशी तुलना होऊ शकत नाही. तेव्हा मी म्हणेन की मला पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा त्रिवेणी संगम दिसतो.
मुख्यमंत्री म्हणाले की, गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी लोकचळवळ उभी केली. गांधीजींच्या आधी सामान्य जनता स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेली नव्हती. लढणारे क्रांतिकारक होते. गांधीजींनी अनेक सामाजिक चळवळी सुरू करून लोकांना चळवळींशी जोडले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता अभियानात सहभागी झाले. पोषण अभियान, नैसर्गिक शेती, बेटी बचाओ-बेटी पढाओ अशी अनेक उदाहरणे आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, सुभाषचंद्र बोस म्हणाले होते की, तुम मुझे खून दो, मैं तु मै आझादी दूँगा. पंतप्रधानांनीही चीन आणि पाकिस्तानशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा पाकिस्तानने पुलवामा केला तेव्हा भारताने घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. आम्ही कोणाला छेडणार नाही पण आम्हाला छेडलं तर सोडणार नाही, असे पंतप्रधान मोदी आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, सरदार पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दोघेही एकतेसाठी झडगताना दिसून येतात. सरदार पटेल यांनी सर्व राज्ये एकत्र केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काश्मीरमधील कलम ३७० हटवून देशाला एकरूप केले. ईशान्येचे चित्र बदलले. आता भारतमातेचा जयजयकार संपूर्ण भारतात ऐकू येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितले की, २०१४ पूर्वी परदेशात भारताला आदराने पाहिले जात नव्हते. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे चित्र बदलले आहे. माझ्या परदेश दौऱ्यात मला विचारण्यात आले की भारताचे पंतप्रधान अंडर अचिव्हर आहेत का? मी उत्तर दिले की ते पंतप्रधान आहेत. भारताचे पंतप्रधान हे कमी साध्य करणारे असू शकत नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
केकेचा मृत्यू मॉब लिंचिंगसारखाच! चाहत्याने सांगितले ऑडिटोरिअममध्ये नेमकं काय घडलं…
नंदीपासून ८३ फुटावर शिवलींग, भिंतीवर त्रिशुळाच्या खुना; ज्ञानवापीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल
मामाची मेहनत ‘अशी’ आली फळाला, UPSC पास करत भाचा झाला मोठा अधिकारी, वाचा यशोगाथा