आमिर खान सध्या लाल सिंह चड्ढा(Lal Singh Chadha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात तो करीना कपूरसोबत दिसणार आहे. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने एकदा सांगितले होते की तो एक इंटेंस लव्हर राहिला आहे आणि त्याच्या प्रेमामुळे त्याने एकदा आपले मुंडन केले होते. जाणून घेवूया संपूर्ण किस्सा काय आहे.(aamir-khan-had-shaved-after-the-girl-refused-then-people-thought-he-was-preparing-a-movie)
वास्तविक, एका मुलीने त्याला नकार दिल्यानंतर आमिर खानने(Aamir Khan) मुंडन केले. त्याने सांगितले होते कि लोकांना वाटायचे कि त्याने कोणत्यातरी चित्रपटाची तयारी म्हणून मुंडण करून घेतले होते, पण एका मुलीने नकार दिल्याने हे त्याचे बालिश कृत्य होते. आमिरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘बर्याच लोकांना वाटायचे की मी हे एका चित्रपटासाठी केले आहे, तर मी हे काही अन्य कारणांसाठी केले होते. मी ज्या मुलीवर प्रेम करत होतो ती मी गमावली होती.’
आमिरच्या या कृतीने दिग्दर्शक केतन मेहताही(Ketan Mehta) शॉक झाले होते. आमिर म्हणाला, ‘एक दिवस ती मुलगी म्हणाली की ती माझ्यावर प्रेम करत नाही, म्हणून मी माझे मुंडन(Shaving) केले. हे अतिशय बालिश कृत्य होते. एके दिवशी केतन मेहताने मला बोलावले होते, जेव्हा मी पोहोचलो तेव्हा त्याला धक्काच बसला आणि त्याने मला विचारले की तुझे केस कुठे आहेत?” तेव्हा तो म्हणाला की मला वाटते की मी एक इंटेंस लव्हर आहे.
आमिर खानने 1984 मध्ये ‘होली’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच वेळी तो ‘यादों की बारात’ आणि ‘मधोश’मध्ये बालकलाकार म्हणूनही दिसला होता. आता आमिर खान लवकरच ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये एका शीख व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये येणार आहे.