AK-47 नाही AK-94, कॅंनडात बसलेल्या गोल्डी ब्रारने कशी केली सिद्धू मुसेवालाची हत्या, वाचा डिटेल्स

प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय व प्रशासकीय विभागात खळबळ उडाली आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात ही घटना घडली. हल्लेखोरांनी मुसेवाला यांच्यावर सुमारे 30 राऊंड गोळीबार केल्याने ते जागीच ठार झाले. गँग लीडर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली होती.(how-goldie-based-in-canada-killed-musewala-in-india-not-ak-47)

गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई गँगने(Lawrence Bishnoi Gang) सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. फेसबुक पोस्टद्वारे दोघांनीही हत्येचे कारण सांगितले.  लॉरेन्स गँगने फेसबुकवर लिहिले की, ‘राम राम भाई सबको… मी आणि माझा भाऊ गोल्डी ब्रार आज सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतो. लोक आम्हाला काहीही बोलुदे पण… पण आमचा भाऊ विकी मिड्दुखेडा याच्या हत्येला त्याची मदत झाली.

आम्ही आमच्या भावाचा बदला घेतला आहे. मी त्याला जयपूरहून फोन केला होता आणि सांगितले की तू चूक केली आहेस. मला कोणाचीही पर्वा नाही, तुला जमेल ते कर, असे सांगितले. मी शस्त्रेही लोड करून ठेवतो आणि आज आम्ही आमचा भाऊ विकीला न्याय मिळवून दिला आहे. ही तर सुरुवात आहे… या हत्येमध्ये कोणाचा हात आहे, त्यांनी तयार राहावे… आज आम्ही सर्व भ्रम दूर केले आहेत. जय… बलकारी…

लॉरेन्स बिश्नोई हा एकेकाळी पंजाब विद्यापीठाचा(Punjab University) विद्यार्थी नेता होता. आता त्याचे भांडण दविंदर बंबीहा ग्रुपसोबत सुरू आहे. दविंदर बंबीहा 2016 मध्ये चकमकीत मारला गेला होता. अजूनही टोळी सुरूच आहे. बांबिहा ग्रुप आर्मेनियामध्ये बसलेला लकी पटियाल चालवतो. 7 ऑगस्ट 2021 रोजी मोहालीमध्ये युवा अकाली नेते विक्रम सिंह उर्फ ​​विक्की मिड्दुखेडा यांची हत्या करण्यात आली होती.

बंबिहा ग्रुपने(Bambiha Group) सोशल मीडियावर सांगितले होते की, विकी हा लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करत होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. या हत्याकांडात सहभागी असलेल्या नेमबाजांना मूसवालाच्या व्यवस्थापकाने आश्रय दिल्याचा आरोप आहे.  हत्येनंतर अवघ्या तीन तासांनी गोल्डी ब्रारने फेसबुकवर पोस्टद्वारे घटनेची जबाबदारी स्वीकारली.

माझ्या साथीदाराच्या हत्येप्रकरणी सिद्धू मुसेवालाचे(Sidhu Moose Wala) नाव पुढे आले होते. सरकारने त्याला शिक्षा केली नव्हती, म्हणून ही हत्या करण्यात आली आहे. गोल्डी ब्रार सध्या कॅनडामध्ये आहे. गँगस्टर गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा असून तो कॅनडाचा गँगस्टर आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये तो वाँटेड आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला फरीदपूर येथील न्यायालयाने जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंग पहेलवान यांच्या हत्येप्रकरणी ब्रारविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. गोल्डी ब्रारचे खरे नाव सतींदर सिंग आहे. पंजाब पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सने(Anti-Gangster Task Force) 1 मे 2022 रोजी भटिंडा येथून गोल्डी ब्रारच्या तीन जवळच्या साथीदारांना अटक केली होती. माळवा भागातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाकडून तो पैसे उकळणार होता, असे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

चंदीगडच्या विद्यार्थी राजकारणातून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले होते. पंजाबमधील फाजिल्का येथील लॉरेन्स बिश्नोईचे वडील पोलिसात होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण फाजिल्का येथे झाले. नंतर चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्येही शिक्षण घेतले. इथून बिष्णोई राजकारणात आले. राजकारणातून गुन्हेगारीकडे वळले. त्याला डॉन बनायचे होते. त्यानंतर तो गुन्हेगारीच्या मार्गावर निघाला.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोईला कुस्तीचा शौक होता आणि तो जवळच्या आखाड्यात कुस्तीचा सराव करत असे. लॉरेन्स बिश्नोईने कॉलेजच्या काळात बनवलेल्या टोळीमध्ये खेळाडूंपासून ते पोलिसांपर्यंत मुलांचा समावेश होता. बिश्नोईने आपले नेटवर्क प्रथम पंजाब आणि हरियाणापर्यंत पसरवले आणि नंतर हळूहळू अनेक राज्यांमध्ये पसरवले. आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले जाळे पसरवत आहे. लॉरेन्स सध्या राजस्थानमधील अजमेर तुरुंगात आहे.

पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP) व्ही के भावरा यांनी सांगितले की, प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या टोळ्यांमधील परस्पर वैमनस्य आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीचा त्यात सहभाग असल्याचे दिसते. रविवारी संध्याकाळी झालेल्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले. पुढील महिन्यात ऑपरेशन ब्लूस्टारच्या वर्धापनदिनानिमित्त तैनात करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मोकळे करण्यासाठी मूसेवालाची सुरक्षा कमी करण्यात आली.

त्याच्यासोबत तैनात असलेल्या पंजाब पोलिसांच्या चार कमांडोपैकी दोघांना काढून टाकण्यात आले. मानसा जिल्ह्यात घडलेल्या घटनेच्या वेळी, मूसवालाने आपल्या उर्वरित दोन कमांडोना(Commando) सोबत घेतले नव्हते. घटनास्थळावरून गोळ्यांचे 30 रिकामे कवच जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात किमान तीन हत्यारे वापरण्यात आली असावीत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आयजी आणि एसपी मानसात तळ ठोकून आहेत. सिद्धू मुसेवाला बुलेटप्रूफ वाहनात नव्हते. लॉरेन्स गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.