टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (GT) ला पहिल्याच सत्रात IPL चॅम्पियन बनवले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (RR) ७ गडी राखून पराभव केला. टीम इंडियातून वगळल्यानंतर हार्दिकला मुंबई इंडियन्सनेही कायम ठेवले नाही. आता दमदार कामगिरी करत त्याने आपल्या संघाला चॅम्पियन बनवले, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे.(Hardik Pandya, Narendra Modi Stadium, Gujarat Titans, IPL Champions)
हार्दिक पांड्या आता ९ जूनपासून टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० सीरीज खेळणार आहे. IPL चॅम्पियन बनल्यानंतर हार्दिकने मोठे वक्तव्य केले आहे. आपली इच्छा व्यक्त करताना तो म्हणाला की, काहीही झाले तरी आता टीम इंडियासाठी विश्वचषक जिंकण्याच ध्येय आहे.
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦! 🏆 🙌
That moment when the @gujarat_titans captain @hardikpandya7 received the IPL trophy from the hands of Mr. @SGanguly99, President, BCCI and Mr. @JayShah, Honorary Secretary, BCCI. 👏 👏#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/QKmqRcemlY
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2022
IPL चॅम्पियन बनल्यानंतर हार्दिक म्हणाला, ‘नक्कीच काहीही झाले तरी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकायचा आहे, यासाठी मी माझी सर्व शक्ती लावीन. मी नेहमीच माझ्या संघाला प्राधान्य देत आलो आहे. माझ्यासाठी लक्ष्य सोपे होईल कारण माझा आत्मविश्वास वाढला आहे. टीम इंडियासाठी खेळणे म्हणजे मोठे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे, त्यासाठी किती सामने खेळले गेले हे महत्त्वाचे नाही.
स्टार अष्टपैलू हार्दिक म्हणाला, टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सर्वात आनंददायी आहे. टीम इंडियात खेळल्यामुळे मला खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे. लॉन्ग टर्म किंवा शॉर्ट टर्म, मला भारतासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. जेव्हा जेव्हा हार्दिक प्लेऑफ खेळला तेव्हा त्याने चॅम्पियन खेळाडू म्हणून सीजन पूर्ण केला. आधी मुंबई इंडियन्सचा खेळाडू आणि आता गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून चार वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.
अंतिम सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. संघाने १०० धावांत ६ विकेट गमावल्या होत्या. यानंतर बाद होत असताना संघाने ९ बाद १३० धावा केल्या. जोस बटलरने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने १८.१ षटकात ३ गडी गमावून १३३ धावा करत सामना जिंकला. या सामन्यात ३० चेंडूत ३४ धावा करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीराचा किताबही मिळाला. या अष्टपैलू खेळाडूने सामन्यात अप्रतिम गोलंदाजीही दाखवली आणि १७ धावांत ३ महत्त्वाचे बळीही घेतले.
महत्वाच्या बातम्या-
गुजरात फायनलमध्ये पोहोचताच हार्दिक पांड्याच्या डोक्यात गेली हवा, म्हणाला, माझं नाव विकलं जातं त्यामुळं..
VIDEO: हार्दिक पांड्याची ती एक चूक गुजरातला घेऊन बुडाली असती, पण नशिबाने दिली साथ
तुला जाऊन आता दोन वर्षे झाली मित्राच्या आठवणीत भावूक झाला हार्दिक, पोस्ट शेअर करत म्हणाला…
देश संकटात तेव्हा कॉंग्रेस नेते विदेशात, ज्येष्ठ नेते मोबाईलमध्ये व्यस्त; हार्दिक पटेल कॉंग्रेसवर बरसले